Home अहमदनगर अहमदनगर: गोळीबार प्रकरण,  फिर्यादीच निघाला आरोपी

अहमदनगर: गोळीबार प्रकरण,  फिर्यादीच निघाला आरोपी

Ahmednagar News: फिर्यादीच आरोपी निघाल्याने खळबळ, आरोपीस अटक.

firing case, the plaintiff turned out to be the accused

श्रीगोंदा | Shrigonda: तालुक्यातील चिंभळे येथे जमिनीच्या वादातुन झालेल्या गोळीबार प्रकरणात फिर्यादी सुनील राजू गायकवाड (वय-३०, रा. चिंभळे, ता. श्रीगोंदा) हाच आरोपी निघाला असून बेलवंडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. जखमी संतोष उर्फ लाला गायकवाड यांच्या जबाबावरून बेलवंडी पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

जयदीप सुरमकर याने जमिनीच्या वादातून संतोष उर्फ लाला गायकवाड यांच्यावर पिस्टलमधून सहा गोळ्या झाडल्याची घटना १० ऑक्टोबर रोजी घडली. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जयदीप सुरमकर व त्याचा साथीदार सचिन उर्फ चिंग्या भागवत याला बेलवंडी पोलीस अटक केली. या प्रकरणात फिर्यादी सुनील गायकवाड याचा सहभाग असण्याचा पोलिसांना संशय होता. त्या अनुषंगाने पोलिसांचा अधिक तपास सुरू होता.

नुकताच पोलिसांनी जखमी संतोष गायकवाड यांचा जबाब घेतला. फिर्यादी सुनील गायकवाड, हल्लेखोर जयदीप सुरमकर व त्याचा साथीदार सचिन उर्फ चिंग्या सोपान भागवत या तिघांनी मिळून गोळीबार घडवून आणल्याचे जखमी गायकवाड यांनी त्या जबाबामध्ये म्हटले आहे. जखमी संतोष गायकवाड यांच्या जबाबावरून बेलवंडी पोलिसांनी फिर्यादी सुनील राजू गायकवाड याला आज (दि.२०)  संध्याकाळी अटक केली आहे. दरम्यान, चिंभळे गोळीबार प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक मोहनराव गाजरे यांनी बारकाईने तपास करीत तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

Web Title: firing case, the plaintiff turned out to be the accused

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here