Home कोल्हापूर धक्कादायक! रस्त्यावरुन फरफटत नेत शाळकरी मुलाचा दगडाने ठेचून खून

धक्कादायक! रस्त्यावरुन फरफटत नेत शाळकरी मुलाचा दगडाने ठेचून खून

Murder News: शाळकरी मुलाचा दगडाने ठेचून खून झाल्याची धक्कादायक घटना.

Murder schoolboy was crushed to death by a stone while walking on the road

कोल्हापूर: येथील मुरगूड रोडवरील बाळूमामानगर परिसरात शुक्रवारी (ता. २०) शाळकरी मुलाचा दगडाने ठेचून खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साकीब समीर पठाण (वय १५, रा. जुने संभाजीनगर, निपाणी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.

खुनाचे नेमके कारण मात्र रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झालेले नव्हते. याप्रकरणी निपाणी शहर पोलिस  संशयित आरोपींचा शोध घेत आहेत. तीन ऑक्टोबरला येथील तरुण राहुल सुभानगोळ याचा महाराष्ट्रातील किल्ले भुदरगड येथे खून झाला होता. गुरुवारी (ता. १९) सायंकाळी साकीब हा घरातून बाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नव्हता. शुक्रवारी सकाळी बाळूमामानगर उद्यान परिसरातील चोपडे यांच्या घराजवळ रक्ताच्या थारोळ्यात साकीबचा मृतदेह आढळून आला.

जिल्हा पोलिसप्रमुख भीमाशंकर गुळेद, चिक्कोडीचे पोलिस उपाधिक्षक गोपाळकृष्ण गौडर, मंडल पोलिस निरीक्षक बी. एस. तळवार, पोलिस उपनिरीक्षक उमादेवी गौडा व शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. साकीबचे आई, वडील, भाऊ, नातेवाईकांनी घटनास्थळी आक्रोश केला. बेळगाव येथील ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.

गुरुवारी (ता. १९) रात्री उशिरा साकीबचा खून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्याचे कुटुंबीय येथील जुने संभाजीनगर परिसरात भाड्याच्या घरात वास्तव्यास आहेत. वडील एमआयडीसीत कामावर असून आई गृहिणी आहे. साकीब आठवीत शिकत होता. त्याला दगडाने ठेचत काही अंतर फरफटत नेल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

महात्मा गांधी रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. आई सिमरन हिने फिर्याद दिली आहे. घटनास्थळी जिल्हा पोलिस प्रमुख भीमाशंकर गुळेद म्हणाले, जुने संभाजीनगरमधील साकीब या अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आला. त्याचा दगडाने ठेचून खून झाल्याचे प्राथमिक तपासात दिसते. याप्रकरणी संशयित आरोपींचा पोलीस शोध सुरु आहेत.

Web Title: Murder schoolboy was crushed to death by a stone while walking on the road

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here