Home अहमदनगर अहमदनगर: “चुलीत गेले नेते अन् चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच लक्ष”;...

अहमदनगर: “चुलीत गेले नेते अन् चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच लक्ष”;  नेत्यांना गावबंदी

Maratha Reservation: करंजी गावात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय. (Ahmednagar News).

Leaders went to the stove and the party went to the stove, Maratha reservation is the only focus

अहमदनगर | कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील करंजी गावात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचं लक्ष” अशा आशयाचे बॅनर लावत जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय पक्ष आणि नेत्यांना ग्रामस्थांनी गावात प्रवेश बंदी केली आहे. 

सरकारने मनोज जरांगे पाटील यांना दिलेली मुदत २४ ऑक्टोबर रोजी संपत आहे. त्यामुळे राज्यभरात मराठा समाज अधिक आक्रमक होताना दिसत आहे. मनोज जरांगे यांनी शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केलं असून राज्यभरात अनेक गावांनी राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदीचा निर्णय घेतला आहे.

कोपरगाव तालुक्यातील करंजी गावातील ग्रामस्थांनी देखील जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी केली आहे. करंजी गावच्या युवकांनी गावात फ्लेक्स बोर्ड लावत आजी माजी मंत्री आणि राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी केली आहे.

मराठा आरक्षणावरून राज्यातलं वातावरण चांगलच तापलं आहे. दोन दिवसांपूर्वी एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली. त्यामुळे मराठा समाजातील व्यक्तींनी आक्रमक भूमिका घेतल्या आहेत. आरक्षणासाठी सरकारला दिलेली मुदत संपण्यासाठी फक्त ३ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या तीन दिवसांनी आरक्षण मिळणार की नाही याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी या गावातही आता सकल मराठा समाजाच्या वतीने फ्लेक्स लावून राजकीय नेत्यांना गावबंदी घालण्यात आली आहे.

यानुसार जो पर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तो पर्यंत आजी-माजी आमदार, राजकीय पुढारी, यांना गावबंदी असणार आहे.

तसेच गावात सरसकट मराठ्यांना ओ.बी.सी.तून ५०% च्या आत आरक्षण द्यावे, अशा आशयाचा भाला मोठा फ्लेक्स गावात लावण्यात आहे. यामुळे आता राजकीय नेत्यांना गावात जाणं अवघड होणार आहे.  

Web Title: Leaders went to the stove and the party went to the stove, Maratha reservation is the only focus

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here