Home क्राईम दगड बांधून मृतदेह फेकला विहिरीत; डोक्यात फावडे मारून संपविले, बेपत्ता युवकाची हत्या...

दगड बांधून मृतदेह फेकला विहिरीत; डोक्यात फावडे मारून संपविले, बेपत्ता युवकाची हत्या !

Nashik Crime: हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकलेल्या अवस्थेत मिळून आला.

body was tied to a stone and thrown into a well Killing of the missing Youth Murder

चांदवड : तालुक्यातील वडाळी जीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या रोशन ज्ञानेश्वर झाल्टे या तरुणाचा मृतदेह साकोरे मिग शिवारातील एका विहिरीत संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. मारेकऱ्यांनी झाल्टे याची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकलेल्या अवस्थेत मिळून आला. त्यामुळे झाल्टे बेपत्ता झाला नव्हता, तर त्याचा खूनच करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून, त्यांनी खुनाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळी नजीक येथील रोशन ज्ञानेश्वर झाल्टे हा तरुण मंगळवारी (दि.१७) सकाळपासून घरून कामानिमित्त गेला होता. मात्र तो पुन्हा घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांकडून पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलीस त्याचा शोध घेत असताना गुरुवारी (दि. १९) अखेर त्याचा मृतदेह साकोरे मिग शिवारातील एका विहिरीत संशयास्पदरीत्या आढळून आला. याप्रकरणी प्राथमिक तपासात त्याची आत्महत्या नव्हे, तर त्याचा खूनच झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी परिस्थितीवरून समोर आल्याने वडाळी नजीक गावात एकच खळबळ उडाली. झालटे याचा खूनच झाल्याचे समोर

आल्याने पिंपळगाव पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्र फिरवित संशयित हृषिकेश घुमरे (रा. उंबरखेड ) व ओमकार डेलें (उंबरखेड रोड, पिंपळगाव बसवंत ) या दोघांना बेड्या ठोकल्या. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यानी खुनाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले असून, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पिंपळगाव पोली ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, नाशिक ग्रामीणचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील भामरे यांनी या खुनाच्या घटनेचा आढावा घेतला असून, पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक पवार तपास करीत आहेत.

डोक्यात फावडे मारून खून

तीन दिवसांपासून बेपत्ता रोशन झाल्टेचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांना प्राथमिक तपासात त्याच्या डोक्यात घाव दिसून आला. त्यामुळे त्याचा खून करूनच त्याला विहिरीत टाकले असण्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यानुसार पोलिसांनी झाल्टे या शक्यता लक्षात घेऊन तपासाची चक्रे फिरवली. यात संशयित हृषिकेश घुमर व ओमकार डेले यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी रोशन झाल्टे याच्या डोक्यात फावडे मारून त्याची हत्या केल्याची कबुली दिली, तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी त्याचा मृतदेह दगड बांधून साकोरे मिग शिवारातील विहिरीत फेकल्याचेही सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: body was tied to a stone and thrown into a well Killing of the missing Youth Murder

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here