Home अहमदनगर अहमदनगर: दुचाकी-चारचाकीची समोरासमोर धडक, एक ठार तर एक गंभीर

अहमदनगर: दुचाकी-चारचाकीची समोरासमोर धडक, एक ठार तर एक गंभीर

Ahmednagar News: दुचाकीवरून जाणाऱ्या दोन वृद्धांना भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी महिंद्रा बोलेरो गाडीने जोराची धडक, अपघातात एक ठार एक जखमी.

Two-wheeler-four-wheeler collided head-on, one killed and one injured

श्रीगोंदा : तालुक्यातील आढळगाव परिसरात श्रीगोंदा ते जामखेड रस्त्याने दुचाकीवरून जाणाऱ्या दोन वृद्धांना भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी महिंद्रा बोलेरो गाडीने जोराची धडक दिली. या भीषण धडकेत एक जणाचा दवाखान्यात उपचार सुरू असताना मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. दिलीप नारायण झगडे असे मयत वृद्धाचे नाव आहे. तर रमेश भानुदास झगडे असे जखमी वृद्धाचे नाव असून याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात बोलेरो चालक अभिषेक बाळासाहेब होले (रा. औटेवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिस ठाण्यात रमेश झगडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी आणि मयत दिलीप झगडे हे दोघे गुरुवारी (दि.१९) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास परिसरात असलेल्या कीर्तनाचा कार्यक्रम ऐकून घरी जाण्यासाठी श्रीगोंदा ते जामखेड रोडने दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या महिंद्रा बोलेरो गाडीने जोराची धडक दिली.

या भीषण धडकेत दिलीप झगडे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्त्राव होवुन ते बेशुध्द झाले होते. तर रमेश झगडे गंभीर जखमी झाले. दोघांना परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी श्रीगोंदा येथील आढळगाव शिवारातील घटना खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र दिलीप झगडे यांची परिस्थिती गंभीर झाल्याने त्यांना नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना शुक्रवारी (दि.२०) दुपारी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी चारचाकी वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two-wheeler-four-wheeler collided head-on, one killed and one injured

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here