खळबळजनक: मायलेकींचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ
Pune News Today: राहत्या घरात मृतदेह आढळून आले आहेत. ही हत्या आहे की आत्महत्या.
पुणे: इंदापूर तालुक्यातील हगारेवाडी येथे मायलेकींचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. राहत्या घरात मृतदेह आढळून आले आहेत. ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, पती सागरला पोलिस घेऊन जात असताना नातेवाईकांनी त्याला मारहाण केल्याचा प्रकारही घडला आहे.
इंदापूर तालुक्यातील हगारेवाडी येथे मायलेकी मृतावस्थेत आढळून आल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अश्विनी सागर म्हस्के वय २८ वर्ष व सानवी सागर म्हस्के वय ४ वर्षी अशी मृतांची नावे आहेत. आज शनिवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास या दोघींचे मृतदेह राहत्या घरातील पत्र्याच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने लटकल्याचे आढळून आले. त्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघींचे मृतदेह उतरवण्यात आले आहेत. मात्र, ही आत्महत्या की हत्त्या याचा शोध वालचंदनगर पोलीस करीत आहे.
दरम्यान, वालचंदनगर पोलीसांनी मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या त्याच्यावर संशय असून त्याला ताब्यात घेऊन जात असताना संतप्त नातेवाईकांना सागर म्हस्के याला चांगलाच चोप दिल्याचा प्रकार घडला आहे. मात्र, सतर्क असलेल्या पोलिसांनी कशीबशी त्याची जमावाकडून सुटका करुन त्याला गाडीत बसवले व पोलिस ठाण्यात नेले. माय-लेकीच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने हगारेवाडी परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
Web Title: Mileki’s body was found
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App