Home अकोले अकोलेत वाकचौरे यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन

अकोलेत वाकचौरे यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन

अकोलेत वाकचौरे यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन

अकोले:-माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या संपर्क कार्यालयाचे आज अकोलेत उदघाटन झाले.या उदघाटन सोहळ्यास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिर्डी लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या अकोले येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन काल संपन्न झाले. 
यावेळी माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये 570 सभामंडप, रस्ते, निळवंडे कॅनालसाठी केंद्रात मी पाठपुरावा करुन प्रश्‍न मार्गी लावला. निवडणुकीत पराभूत झालो तरी जनसंपर्क सोडला नाही. प्रत्येक गावागावात माझा जनसंपर्क असून या निवडणूकीत जनता जनार्दन माझे मायबाप असून सत्ताधारी व प्रस्तापितांच्या विरोधात माजी ही निवडणूक युवक व सच्चे कार्यकर्ते व जनतेने हाती घेतली आहे. मी माझ्या विकासकामांबद्दल बोलण्यापेक्षा जनतेच्या मनात आपला माणूस आपल्यासाठी ही संकल्पना मनी उतरविण्यात भाऊसाहेब सक्षम ठरला आहे. 
शिर्डी लोकसभा मतदार संघातील खासदार झाल्यानंतर 6 विधानसभा मतदार संघातील असे एक गाव नाही की त्या गावामध्ये वाकचौरे दिसले नाही. मी गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी, शिर्डी संस्थानमध्ये कार्यकारी अधिकारी ते आजच्या क्षणापर्यंत माझा जनतेशी संपर्क राहिला आहे. जनता मला दोन्ही उमेदवारांपेक्षा मोठया मताधिक्क्यानी विजयी करेल. असा मला विश्‍वास आहे. या विश्‍वासाला दहा वर्ष मी तडा जावू दिला नाही. दोन्ही उमेदवारापेंक्षा मी या लोकसभा मतदार संघातील अनुभवी व अधिकारी असल्यामुळे विकासाची गंगा मतदार संघात आणण्यामध्ये यशस्वी ठरलो. भविष्यकाळात हा मतदार संघ आपला माणूस आपल्यासाठी या कल्पनेला साथ देईल. धनदांगडे माझ्या विरोधात असले तरी 29 तारखेच्या मतपेटीत वेगळे चित्र पहावयास मिळेल. पक्षाने कारवाई केली मात्र मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भक्त असून विजयी झालो तरी मोदींनाच माझा पाठींबा राहिल.
यावेळी विनोंद हांडे, रामहारी चौधरी, अगस्ती साखर कारखान्याचे माजी संचालक रामनाथ शिंदे, अ‍ॅड. दिपक थोरात, उद्योजक अमोल बोर्‍हाडे, अकोले तालुका खादी ग्रामोद्योगचे माजी अध्यक्ष बाळासाहेब वाकचौरे, विकास बंगाळ, भास्कर कदम, किरण चौधरी, राजेंद्र खैरे, विकास कोटकर, राजेंद्र शिंदे, रणजित खैरे, भाउसाहेब बोर्‍हाडे यासंह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
काल गुरुवार आठवडे बाजारात त्यांनी व्यापारी, शेतकरी, सर्व सामान्य जनतेची पदयात्रेतून भेटी घेत या निवडणूकीत माझ्याकडे लक्ष द्या, तालुक्याच्या भूमीपुत्राला पुन्हा एकदा संधी द्या, असे आवाहन केले.
अकोले शहरातील जनतेला आपल्या भूमीपुत्राचे दर्शन होताच साहेब या निवडणूकीत आम्ही नेत्यांचे ऐकनार नसून आम्ही आपल्या पाठीशी आहोत. आपण पाच वर्षात सभा मंडप देवून आमच्या मुला मुलींची व सामुदायिक कार्यक्रम आजही या सभामंडपात होत असल्यामुळे आपली आठवण मधील पाच वर्षाच्या कार्यकाळात नेहमी जाणवली. विधानसभेला आमच्या नेत्यांचे ऐकुन आता मात्र लोकशाहीचा आनंद उत्सव आपल्या विजयानेच साजरा करु अशा प्रतिक्रिया वयोवृध्द महीला जेष्ठ नागरीक व्यापारी वर्गाने व्यक्त केल्या.

 

Website Title: Bhausaheb Wakchaure Contact karyalay 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here