Home अकोले भाउसाहेब वाकचौरे यांनी साईबाबा संस्थान शिर्डीचा विश्वस्त पदाचा राजीनामा त्वरित द्यावा अन्यथा...
भाउसाहेब वाकचौरे यांनी साईबाबा संस्थान शिर्डीचा विश्वस्त पदाचा राजीनामा त्वरित द्यावा अन्यथा अकोले तालुक्यात फिरु न देण्याचा इशारा
भाउसाहेब वाकचौरे यांनी साईबाबा संस्थान शिर्डीचा विश्वस्त पदाचा राजीनामा त्वरित द्यावा अन्यथा अकोले तालुक्यात फिरु न देण्याचा इशारा
अकोले: माजी खासदार भाउसाहेब वाकचौरे यांनी साईबाबा संस्थान शिर्डीचा विश्वस्त पदाचा राजीनामा त्वरित द्यावा अन्यथा अकोले तालुक्यात फिरु न देण्याचा इशारा भारतीय जनता युवा मोर्चा अकोले वतीने देण्यात आलेला आहे.
शिर्डी मतदासंघात अपक्ष उमेदवारी करुन भाऊसाहेब वाकचौरे यांनी बंडखोरी केलेली असुन युतीधर्म मोडला आहे त्यामुळे पक्षाच्या वतीने कारवाई करत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पक्षातुन हाकलपट्टी केली आलेली आहे. भाजप पक्षाच्या कोट्यातुन मिळालेले विश्वस्तपदाचा त्यांनी त्वरीत राजीनामा दिलाच पाहीजे. गद्दारी ज्यांचा रक्तात आहे असे वाकचौरे यांनी साईबाबा ना फसवले असून शिवसेना, काँग्रेस व भाजप या सर्व पक्षांना चुना लावला आहे. कार्यक्षम म्हणणारे वाकचौरे यांना संपूर्ण खासदार निधी वापरता आला नाही ते कसले कार्यक्षम असा सवाल ही उपस्थित केला. अकोले तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर होण्यासाठी वाकचौरे यांनी काय प्रयत्न केले. अश्या या सर्व पक्षांना फसविणार्या वाकचौरे यांना जनता फसविणार असून त्यांचे अनामत रक्कम ही वाचणार नाही असे प्रसिद्धी पत्रक भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने काढण्यात आलेले असुन असे भाजयुमो तालुकाध्यक्ष इश्वर वाकचौरे, सरचिटणीस सुनिल उगले वाल्मिक देशमुख, वाल्मिक नवले, अविनाश कानवडे, अंकुश वैद्य, जालिंदर बोडके, अमोल कोटकर, नरेंद्र नवले, मदन आंबरे, रवी घुले योगेश नाईकवाडी, प्रविण सहाणे, सुनिल पुंडे, ज्ञानेश पुंडे, राम रुद्रे, वैभव गोर्डे, गणेश वाकचौरे, सुशांत वाकचौरे, जनार्दन गोर्डे, संदीप देशमुख, अमोल लांडगे, अमर मुरुमकर, मच्छिंद्र चौधरी, तुकाराम भोर, राहुल चव्हाण, शिवाजी पारासुर आदी पदाधिकांरी कार्यकत्यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केलेली आहे.
Website Title: Bhausaheb Wakchaure resignation of Shirdi Sansthan