Home अकोले धनगर आरक्षण बाबद आपली भूमिका खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली व्यक्त

धनगर आरक्षण बाबद आपली भूमिका खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली व्यक्त

धनगर आरक्षण बाबद आपली भूमिका खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली व्यक्त

अकोले: आदिवासी महादेव कोळी समाजाच्या आरक्षणाला व सोयी सवलतीना धक्का न लावता मराठा आरक्षण प्रमाणे इतरांना आरक्षण मिळावे असे माझे मत आहे ताकाला जाऊन गाडगे लपवणे अशी आपली दुटप्पी भूमिका नाही असे धनगर आरक्षण बाबद आपली भूमिका खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केले.

          शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी अकोले तालुक्यातील आदिवासी विभागातील गावांना भेट देऊन मतदारांशी सवांद साधला. त्यावेळी ते शेंडी व मवेशी येथे मतदारांशी बोलत होते.या दौऱ्यात अशोकराव भांगरे, यमाजी लहामटे, मधुकर तळपाडे, जिप सदस्य डॉ किरण लहामटे, सौ सुनीता भांगरे, भाजपचे तालुका अध्यक्ष सिताराम भांगरे, शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, पंचायत समिती सभापती रंजना मेंगाळ, उपसभापती मारुती मेंगाळ, सदस्य दत्ता देशमुख, अलका अवसरकर, जिप चे माजी सदस्य बाजीराव दराडे, सतीश भांगरे शिवसेना महिला आघाडी संपर्क प्रमुख सुरेखा गव्हाणे आदी उपस्थित होते.

           खासदार लोखंडे यांनी आदिवासी समाजाच्या बाजूने नरेंद्र मोदी असून देशाच्या विकासात या समाजाचे मोठे योगदान आहे अकोले तालुक्यातील आदिवासी समाजासाठी कृषी प्रोड्युसर कंपनी च्या माध्यमातून तांदूळ मिल ला परवानगी मिळाली असून लवकर सुरू होईल यातून या परिसरात नाबार्ड चे बचतगट सुरू करून महिला सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जाईल

       अकोले तालुक्यातुन जाणारा शहापूर गेवराई राष्ट्रीय महामार्गाला परवानगी मिळाली असून घाटघर वरून हा रस्ता मुंबईला जाईल तर तोलरखिंड फोडण्यासाठी चा प्रस्ताव नितीन गडकरी कडे असून तो मार्गी लावण्यासाठी मला संसदेत पाठवा असे आवाहन त्यांनी केले.

         आदिवासी समाजात आरक्षण संदर्भात कितीही खोट पसरवले तरी पर्यटन विकास करण्यासाठी व तरुणांना रोजगार निर्मिती करण्यासाठी लोखंडे यांना मतदान करण्याचे आवाहन अशोक भांगरे यांनी केले तसेच आदिवासी समाजात पिचड यांनी घुसखोरी केली असून मंत्री पदाचा दुरूपयोग केलेमुळं पिचड लवकरच जेल मध्ये असतील असेही त्यांनी सांगितले तर आदिवासींच्या आरक्षण मध्ये कोणीही वाटेकरी झाले तर त्याचा बंदोबस्त केला जाईल मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार देशात येण्यासाठी शिवसेना उमेदवार ला आम्ही उमेदवार आहे असे समजून मतदान करा असे जीप सदस्य डॉ किरण लहामटे यांनी आवाहन केले.

        यावेळी आदिवासी भागातील अनेक नेते हजर होते यावेळी मवेशी ग्रामस्थ च्या वतीने सभामंडप दिले बद्दल सत्कार करण्यात आला त्यात माजी उपसभापती रामनाथ भांगरे,मुरली भांगरे, सुरेश गभाले, विठ्ठल धिंदळे पांडू ईदे, बुधा गंगाड, मारुती खाडे, पोपट चौधरी, लक्ष्मण भांगरे आदी ची भाषणे झाली.

         कार्यक्रम चे सुत्रसंचलन शेंडी चे सरपंच दिलीप भांगरे व माजी पंस सदस्य शरद कोंडार यांनी केले.

Website Title: Dhangar Reservation MLA Sadashiv Lokhande 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here