राजूर कुस्ती केंद्राचा शुभम लांडगे बनला चांदीच्या गदेचा मानकरी
राजूर: दि 20 एप्रिल चास ता :आंबेगाव जि :पुणे या ठिकाणी कुस्ती आखाडा भरवण्यात आला होता , त्या आखाड्या मध्ये अँड एम एन देशमुख साई कुस्ती राजूर केंद्रातील कुस्ती संघ सहभागी झाला होता , याच वर्षी पैलवान शुभम लांडगे याने वर्धा येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले असल्यामुळे चास (आंबेगाव )मधील गावकऱ्यांनी शुभम लांडगे याची मानाची कुस्ती लावण्याचा निर्णय घेण्यात आला , त्याची कुस्ती पुणे येथील आमदार महेश दादा लांडगे यांच्या तालमीतील प्रसिध्द पैलवान जादू शिर्के याच्या सोबत जोडण्यात आली , एक तुल्यबळ प्रेक्षणीय कुस्ती गावकऱ्यांनी जोडली , ही कुस्ती सुमारे 45 मिनीटे चालली होती त्याच समयाला पैलवान शुभम लांडगे याने प्रति स्पर्धेस छडी टांग डावा वरती प्रेक्षणीय विजय मिळवून अँड: एम. एन देशमुख साई कुस्ती केंद्राचे नाव उज्वल केले ,
शुभम लांडगे हा भारतीय खेल प्राधिकरण नवी दिल्ली यांनी दत्तक घेतलेल्या अँड एम.एन देशमुख कुस्ती साई कुस्ती राजूर या ठिकाणी सराव करत आहे , याच वर्षी चालू सीजण मध्ये आखाड्यातील तीन खेळाडूंनी तीन चांदीच्या गदा मिळवल्या गेल्या आहेत त्या मध्ये पै वैभव डेंगळे , पै अरुण गवारी व पै शुभम लांडगे या सर्व खेळाडूंना कुस्ती केंद्राचे कोच आंतरराष्ट्रीय पदक विजेते तानाजी नरके सर यांचे मार्गदर्शन मिळत आहे ,
तसेच अँड एम .एन देशमुख कॉलेजचे प्राचार्य श्री .बी .एस देशमुख व शारीरिक शिक्षक श्री.व्ही बी नवले , तसेच संस्थेचे अध्यक्ष अँड .श्री .एम .एन देशमुख , सचिव श्री .टी .एन कानवडे , सह सचिव श्री मिलिंद उमरानी आदि सर्वानी शुभम लांडगे याचे अभिनंदन केले .
Website Title: Rajur Shubham Landage wrestling centre became a silver medalist