Home अकोले राजूर: निवडणुकीबाबत आदिवासी भागात उदासीनता

राजूर: निवडणुकीबाबत आदिवासी भागात उदासीनता

राजूर: निवडणुकीबाबत आदिवासी भागात उदासीनता

राजूर: लोकसभा निवडणुकीचे घमासान सर्व देशात, सोशियल मेडिया, प्रिंट मेडिया व इलेक्ट्रोनिक मेडीया सुरु असताना अकोले तालुक्यातील आदिवासी भागात उमेदवारांसह कार्यकर्ते व सामान्य मतदार उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे.

सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. सर्व पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतानाच सोशियल मेडियावरही त्याची चर्चा करत आहे. मात्र सगळ्यापासून अकोले तालुक्यातील आदिवासी अनभिन्य आहेत. दुर्गम भागात शांतात असून कार्यकर्ते हातावर हात धरून बसले आहेत. अकोले तालुका नाशिकएवजी शिर्डीला जोडल्यापासून व शिर्डी लोकसभा संघ राखीव झाल्यामुळे निवडणुकीत चुरस राहिली नसल्याचे कार्यकर्ते खासगीत बोलत आहे. रसद नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निराशाजनक परिस्थिती आहे. उमेदवार अजूनही या भागातील सर्व मतदारांपर्यंत पोहोचलेले नाहीत. या भागात लाउडस्पीकर प्रचार नाही कि, मोठ्या स्टार प्रचारकांच्या सभा नाहीत. कार्यकर्तेहि आपापल्या कामात व्यग्न आहेत. सर्वच आघाड्यांवर शांतता असल्याने निवडणुकीत कोण विजयी होईल हे सांगणे अवघड बनले आहे.    

Website Title: Rajur Tribulation in tribal areas about elections

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here