बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू
Breaking News | Pune Accident: एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना.
पुणे : एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. १५ जून) सायंकाळी घडली. या तरुणीने हेल्मेट परिधान केले होते. मात्र, त्याचा पट्टा न लावल्याने ते उडून पडले होते. या प्रकारामुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
श्वेता चंद्रकांत लिमकर (वय २५, रा. कागल, जि.कोल्हापूर) हे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणीचे नाव आहे. श्वेता खेड-शिवापूर भागातील एका कंपनीत नोकरीस होती. ती शनिवारी सायंकाळी कामावरून घरी चालली होती. कात्रज चौकात सायंकाळी श्वेताला महाबळेश्वर-पुणे या मार्गावरील एसटी बसची धडक लागली. त्यामुळे तोल गेल्याने ती रस्त्यात पडली. त्या वेळी तेथून सांगली-स्वारगेट या मार्गावरील जाणाऱ्या जात असलेल्या बसच्या चाकाखाली सापडल्याने तिचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर कात्रज चौकात वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांनी एसटी चालकाला ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
Web Title: Bike rider girl dies in bus collision
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study