Home महाराष्ट्र Board Exam Result: १० व १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत मोठी बातमी

Board Exam Result: १० व १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत मोठी बातमी

Board Exam Result Big news about the results of 10th and 12th class students

औरंगाबाद | Board Exam Result: राज्यातील कायम अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी बोर्डाच्या परीक्षेचे पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल यावेळी रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर आत्तापर्यंत पार पडलेल्या बारावीच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणीविना विभागीय मंडळात पडून असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वीच महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने आपल्या विविध मागण्यांसाठी सरकारला निवेदन दिले होते. तर याबाबत पत्रकार परिषद घेऊन, आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास दहावी-बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा या कृती समितीने दिला होता. त्यानुसार विनाअनुदानीत शाळांमधील तब्बल ३० हजार शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे.

राज्य बोर्डाकडून शिक्षकांना उत्तरपत्रिकेचे गठ्ठे तपासणीसाठी पाठवण्यात येत आहे. मात्र आपल्या मागण्यांवर ठाम असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांकडून ते गठ्ठे स्वीकारले जात नाही ते पुन्हा बोर्डाकडे पाठविले जात आहे. त्यामुळे या वर्षी दहावी-बारावीच्या परीक्षांचा निकाल रखडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर आता शिक्षणमंत्री काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Board Exam Result Big news about the results of 10th and 12th class students

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here