Home महाराष्ट्र Drowned: दोन सख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

Drowned: दोन सख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

Two brothers drowned in a field

नाशिक | Nashik: दोन सख्या चिमुरड्या भावांचा शेततळ्यात बुडून (Drowned) मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घडली आहे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लोणवाडी परिसरात आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. कुणाल गायकवाड आणि गौरव गायकवाड असं दोन सख्ख्या भावांच नाव आहे. दोन सख्या भावांच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कुणाल गायकवाड आणि गौरव गायकवाड हे खेळत असताना खेळता खेळता दोघे शेतात गेले. शेततळ्याजवळ खेळत असताना अचानक कुणालचा पाय घसरला आणि तो शेततळ्यात पडला. गौरवने जोरात आरडाओरडा केला पण शेताजवळ कुणीही नव्हते. त्यामुळे गौरवने कुणालला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्याचाही तोल गेला आणि तोही शेततळ्यात पडला. त्यामुळे दोघांचाही बुडून मृत्यू झाला.

बऱ्याच वेळ झाला म्हणून कुणाल आणि गौरव घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. शेततळ्यात जवळ जाऊन पाहिले शेततळ्यात दोघांचाही मृतदेह (Dead bodies) आढळून आला. त्यामुळे कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. या घटनेने  परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Two brothers drowned in a field

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here