व्याजाच्या बदल्यात महिलेकडे शरीरसुखाची मागणी, धक्कादायक दोन वर्ष सुरु होता प्रकार
धुळे | Dhule Crime: धुळे येथून खासगी सावकाराबाबत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका खाजगी सावकाराने व्याजाच्या पैशांसाठी एका तरुण दाम्पत्याला बेदम मारहाण केली तसेच नराधम आरोपीने व्याजाच्या पैशांच्या मोबदल्यात महिलेकडे शरीरसुखाची मागणी (Demand sexual relation) केली आहे. याबाबत पीडित तरुणानं पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एकूण 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार 6 ऑक्टोबर 2020 ते 25 मार्च 2022 या दरम्यान घडला.
दरम्यानच्या काळात आरोपींनी वेळोवेळी मारहाण आणि धमकी देऊन या दाम्पत्याचा मानसिक छळ केला आहे. घटनेच्या दिवशी 25 मार्च रोजी आरोपींनी फिर्यादी तरुणाला आणि त्याच्या पत्नीला काठीने मारहाण केली होती. या मारहाणीत फिर्यादीच्या गरोदर पत्नीच्या पोटाला गंभीर दुखापत केली. यामुळे बाळाला धोका निर्माण झाला आहे. मारहाणीनंतर आरोपी जितेंद्र बैसाणे, समीर गवळी आणि कल्याण गरूड यांनी फोन करून फिर्यादीच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली आहे.
यानंतर पीडित दाम्पत्यानं पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी खाजगी सावकारी प्रतिंबधक अधिनियमासह अन्य कलमाअंतर्गत 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. व्याजाच्या (interest) बदल्यात शरीर संबंधाची (Sexual relation) मागणी केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.
Web Title: Demand sexual relation for interest money