Home मुंबई बॉयलर अटेंडंट जनरल कामगार सेना संघटनेच्या वतीने, बाष्पके संचालनालयाचे संचालक व सहकार्यांचा...

बॉयलर अटेंडंट जनरल कामगार सेना संघटनेच्या वतीने, बाष्पके संचालनालयाचे संचालक व सहकार्यांचा सत्कार

महाराष्ट्र राज्य बॉयलर अटेंडंट जनरल कामगार सेना संघटनेच्या वतीने, बाष्पके संचालनालयाचे संचालक व त्यांच्या सहकार्यांचा सत्कार.

Boiler Attendan Boiler Directorate and colleagues felicitated

 

मुंबई: बॉयलर इंडिया 2022 चा समारोप १६ सप्टेंबर २०२२ रोजी शानदार संपन्न झाला. बॉयलर इंडिया 2022 चे आयोजन, नियोजन व विविध विषय कौशल्य पूर्वक हाताळून बॉयलर निगडीत व्यक्तींना बहुमुल्य मार्गदर्शन व ज्ञान दिले. या साठी मानावे तेवढे आभार कमीच आहेत.

महाराष्ट्र राज्य बॉयलर अटेंडंट जनरल कामगार सेना संघटनेच्या वतीने बाष्पके संचालनालयाचे संचालक मा .श्री धवल अंतापूरकर साहेब व बाष्पके संचालनालयाचे उपसंचालक मा.श्री वानखेडे साहेब यांचा सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र सरकारच्या कामगार विभागांतर्गत असलेल्या बाष्पके संचालनालयाच्या वतीने आयोजित जागतिक स्तरावरील बॉयरल इंडिया 2022 प्रदर्शन, चर्चासत्र व कार्यशाळेचे उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत व कामगार मंत्री तथा परिषदेचे स्वागताध्यक्ष सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले.

राज्यात उद्योगासाठी पूरक वातावरण असून उद्योगांना लागणार्‍या सर्व सुविधा व प्रोत्साहनपर पॅकेज राज्य शासन देईल,  असे प्रतिपादन उद्योगमंत्री सामंत यांनी केले.

बॉयलर इंडिया 2022 प्रदर्शन, चर्चासत्र वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्राच्या ठिकाणी तीन दिवस (14, 15 आणि 16 सप्टेंबर) भरविण्यात आले होते. बाष्पके उद्योगातील नवनवीन तंत्रज्ञान, घडामोडी यांची माहिती होण्यासाठी चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

 

उदघाटनाला आमदार निरंजन डावखरे, आमदार महेश बालदी, आमदार रमेश पाटील, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल, विभागीय आयुक्त तथा रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, कामगार आयुक्त सुरेश जाधव, बाष्पके संचालनालयाचे संचालक धवल अंतापूरकर, अदानी पॉवरचे थर्मल हेड चैतन्य प्रसाद साहू, थायसन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भाटिया आदी उपस्थित होते.

Boiler Attendan Boiler Directorate and colleagues felicitated

समारोपाला प्रमुख पाहुणे इंडोनेशिया चे कौन्सिल जनरल श्री. ऑगस सपतोनो, इकॉनॉमिक कौन्सिल श्री. तोला उबेदि, श्री. प्यांगि सपुत्रा, कॉमर्स चेम्बर ऑफ ढाक्का बांग्लादेशचे श्री. मोहम्मद अब्दुल मनान, इंडस्ट्रियल बॉयलर इंडियाचे संचालक रोहिंटन इंजिनियर उपस्थित होते.

या प्रदर्शनात जर्मनी, स्वित्झर्लंड, इंग्लंड यासह दहा देशांतील सुमारे 280 उद्योजकांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदविला आहे. बाष्पके (बॉयलर) संबंधित विविध यंत्रे, साहित्य यांची मांडणी येथे होती.

उद्योग विभाग:

बाष्पके (बॉयलर) क्षेत्रात होणारे बदल, या क्षेत्रासंबंधीची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त आहे. कामगार व उद्योग विभाग एकत्र येऊन उद्योगांना चांगल्या सुविधा देऊ. सध्या असलेल्या व नवीन उद्योगांनाही इतर राज्यांपेक्षा वीज, जमीन व इतर प्रोत्साहनपर सुविधा महाराष्ट्र शासन देईल.

– उदय सामंत, उद्योग मंत्री

कामगार विभाग:

कामगार मंत्री खाडे म्हणाले की, उद्योग क्षेत्रात राज्य अग्रेसर ठेवण्यासाठी कामगार विभाग योगदान देत असून उद्योगांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. उद्योग उभारण्यासाठी परवान्यांची सुलभता, कामगारांची सुरक्षितता व कामगारहित या त्रिसूत्रीची अंमलबजावणी राज्यात प्रभावीपणे सुरू आहे. उद्योग व कामगार विभाग हे एकत्र काम करीत आहेत. बॉयलर हा सर्व उद्योगांचा महत्त्वाचा घटक आहे.

या प्रदर्शनाला तब्बल ३६ हजार अभ्यांगताच्या भेटी, देश विदेशातील २५०० मान्यवरांची उपस्थिती होती.

या चर्चासत्रात एकूण ५५ वक्त्यांनी मार्गदर्शन केले. तर विविध विषयांवर ३० माहितीपर व्याख्याने पार पडली. मालदीव, बांग्लादेश यासह विविध ६ देशांच्या भारतातील वाणिज्य महादूतांनी प्रदर्शनास भेट दिली. प्रदर्शनाच्या अखेरच्या दिवशी मालदीव, बांगलादेश, आफ्रिका , फिनलँड, स्वीडन या देशाच्या प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शविली. तसेच देशभरातील बाष्पक निर्माते, बाष्पक वापरकर्ते, सल्लागार, विविध कारखान्याचे प्रतिनिधी, इंजिनिअर्स, शासकीय अधिकाऱ्यांनी प्रदर्शन व चर्चासत्राला भेट दिली.

प्रदर्शनाच्या अखेरच्या दिवशी प्रदर्शनानिमित्त सहभागी कंपन्यांना विविध सहा विभागात पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यामध्ये पहिल्या विभागात प्रथम पुरस्कार अडाणी इलेक्ट्रिसिटीला, तर द्वितीय पुरस्कार अडाणी पॉवर तसेच तृतीय पुरस्कार टाटा पॉवरला प्रदान करण्यात आला. दुसऱ्या विभागात प्रथम पुरस्कार फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड, दुसरा पुरस्कार रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड तर तृतीय पुरस्कार बिरला कार्बन इंडियाला प्रदान करण्यात आला.

Web Title: Boiler Attendan Boiler Directorate and colleagues felicitated

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here