Home क्राईम Rape: ऑफिसमध्ये नोकरीस आलेल्या तरुणीला गुंगीचे औषध पाजून मालकाने केला बलात्कार

Rape: ऑफिसमध्ये नोकरीस आलेल्या तरुणीला गुंगीचे औषध पाजून मालकाने केला बलात्कार

Pune rape Case:  तू मला आवडतेस म्हणत जवळ ओढण्याबरोबरच बाहेरगावी कामाच्या निमित्ताने घेऊन जात गुंगीचे औषध पाजून बलात्कार.

young woman was rape by the owner after giving her gungi medicine

पुणे : राज्यात बलात्कार, अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच पुण्यातील वानवडी येथील आरोपीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑफिसमध्ये नोकरीस आलेल्या तरुणीला कामाच्या बहाण्याने वारंवार बोलावून ‘तू मला आवडतेस म्हणत जवळ ओढण्याबरोबरच बाहेरगावी कामाच्या निमित्ताने घेऊन जात गुंगीचे औषध पाजून बलात्कार करणाऱ्या मालकाविरूद्ध खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदयन सरूश जैन (वय ३६, राहुल रेसिडन्सी, वानवडी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका २६ वर्षीय तरुणीने फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार २१ जानेवारी २०२१ ते १८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत घडला.

आरोपी जैन याची आर्किटेक्चर प्रोपरायटरी फर्म आहे. याठिकाणी तरुणी कामाला होती. कामाच्या बहाण्याने आरोपी वारंवार बोलावून तिला जवळ ओढत असे. कामाच्या निमित्ताने तिला वारंवार बाहेरगावी नेत तिच्या कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध घालत तिच्या इच्छेविरूद्ध शरीरसंबंध ठेवले. मध्यप्रदेशच्या हॉटेलसह ऑफिसमध्ये देखील हे प्रकार वारंवार केल्याचे तरूणीने फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. त्यानुसार आरोपीवर ३७६ (२), ३५४ (अ), ३३८, ५०६ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक वैशाली टोटेवार करीत आहेत.

Web Title: young woman was rape by the owner after giving her gungi medicine

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here