संगमनेर: विद्युतवाहक तारेचा शॉक बसल्याने दोन बैलांचा मृत्यू तर शेतकरी गंभीर
Sangamner: रस्त्यावर तुटून पडलेल्या विद्युतवाहक तारेचा शॉक (Electric Shock) बसल्याने दोन बैलांचा मृत्यू झाला, तर शेतकरी जखमी.
संगमनेर: रस्त्यावर तुटून पडलेल्या विद्युतवाहक तारेचा शॉक बसल्याने दोन बैलांचा मृत्यू झाला, तर शेतकरी जखमी झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव शिवारात शनिवार दि. 17 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 2.30 ते 3 वाजेच्या सुमारास घडली.
चिंचोली गुरव येथील शेतकरी सुरेश किसन सोनवणे हे आपल्या 2 बैलांसह शनिवारी दुपारी 2.30 ते 3 वाजेच्या दरम्यान जनावरांना चारा आणण्यासाठी बैलगाडी घेवून शेतात जात असतांना रस्त्यावर तुटून पडलेल्या विद्युतवाहक तारेचा शॉक बसून दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला. तर शेतकरी सुरेश सोनवणे हे या घटनेत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गावातीलच खाजगी एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. कामगार तलाठी अमोल गडाख यांनी सदर घटनेचा पंचनामा केला. सदर दुर्घटनेतील शेतकर्यास शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी चिंचोली गुरव ग्रामपंचायतचे सदस्य बाबासाहेब सोनवणे व सामाजिक कार्यकर्ते सचिन आभाळे यांनी यांनी केली आहे.
Web Title: Two bulls died and a farmer was seriously injured due to electric shock