Home क्राईम संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या आवारातून रिक्षाची चोरी- Theft

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या आवारातून रिक्षाची चोरी- Theft

Sangamner Theft: पोलीस ठाण्याच्या आवारातूनच रिक्षाची चोरी झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित.

Rickshaw theft from Sangamner city police station premises

संगमनेर: शहरात कोणत्या ना कोणत्या भागात सातत्याने चोरी होत आहे. शहर पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने चोरटे फायदा घेत आहे. संगमनेरातील चोरट्यांचे दिवसेंदिवस धाडस वाढत आहे. आता एका चोरट्याने चक्क संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या आवारातूनच रिक्षा चोरी केल्याची घटना घडली आहे.

एका चोरट्याने तर मोठी हिम्मत करून पोलीस ठाण्याच्या भिंतीजवळ उभी असलेली रिक्षा चोरून नेली. शहर पोलीस ठाण्यासमोर भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाजवळ राहणार्‍या संतोष नवले या रिक्षा चालकाची रिक्षा संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या भिंती लगत उभी करण्यात आलेली होती. ही रिक्षा काही दिवसापासून बंद अवस्थेत होती.

अज्ञात चोरट्याने गुरुवारी रात्री ही रिक्षा चोरून नेली. पोलीस ठाण्याच्या आवारातूनच रिक्षाची चोरी झाल्याने पोलिसांनी तातडीने त्या रिक्षाचा तपास सुरू केला. ही रिक्षा सापडून पोलीस ठाण्यात आणली. रिक्षाची पुन्हा चोरी होऊ नये यासाठी पोलिसांनी नवीन साखळी आणून ही रिक्षा पोलीस ठाण्याजवळ एका ठिकाणी बांधून टाकली. शहर पोलीस ठाण्याच्या आवारातूनच रिक्षाची चोरी झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Rickshaw theft from Sangamner city police station premises

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here