Home अहमदनगर अहमदनगर: तलवारीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहमदनगर: तलवारीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Ahmednagar: Minor girl abused शेवगाव तालुक्यातील घटना: तरुण गजाआड.

minor girl was abused by threatening her with a sword

शेवगाव : तिच्या बहिणींना दुसऱ्या खोलीत कोंडून तलवारीचा धाक दाखवत सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना शेवगाव तालुक्यात घडली. पीडित मुलीच्या फिर्यादीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीला शेवगाव पोलिसांनी गजाआड केले.

४ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घरातच बहिणींना कोंडून कडी लावत तलवारीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत एका तरुणाने अत्याचार केला. त्यानंतर ‘तू मला आवडतेस, माझ्याशी लग्न कर, लग्न नाही केले तर तुला व तुझ्या आई, वडिलांना मारून टाकीन’ अशी धमकी त्या तरुणाने दिल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून शस्त्र बाळगणे, पोस्को, बाल लैंगिक अत्याचाराचा २८ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शेवगाव पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. शेवगाव पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.

Web Title: minor girl was abused by threatening her with a sword

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here