संगमनेर: दुकानाची भिंत फोडून देशी मद्याचे बॉक्स लंपास
Breaking News | Sangamner: सरकारमान्य देशी दारूच्या दुकानाची भिंत फोडून चोरट्यांनी दुकानातील देशी मद्याचे ४६,५६० रुपये किमतीचे १६ बॉक्स चोरून नेले.
संगमनेर: तालुक्यातील वडगाव पान गावात असलेल्या एस. एस. जहागीरदार यांच्या सरकारमान्य देशी दारूच्या दुकानाची भिंत फोडून चोरट्यांनी दुकानातील देशी मद्याचे ४६,५६० रुपये किमतीचे १६ बॉक्स चोरून नेले. काही महिन्यांपूर्वी वडगाव पान गावात सलग चोऱ्या होत होत्या. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही कारवाई होत नव्हती.
आता पुन्हा चोरट्यांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. सुरेश गेणराज काशीद यांनी फिर्याद दिली. तपास पो. नि. देविदास ढुमणे व पो. ह. संपत जायभाये करीत आहेत.
Web Title: breaking the wall of the shop, they looted boxes of country liquor
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study