Home अकोले अकोले: ग्रामसेवकाला शिवीगाळ, धमकी; तिघांवर गुन्हा

अकोले: ग्रामसेवकाला शिवीगाळ, धमकी; तिघांवर गुन्हा

Breaking News | Akole Crime:  ग्रामविकास अधिकारी शरद मार्तंड वावीकर यांना गौणखनिजाबाबत ना हरकत दाखल्यावरून अरेरावी करत शिवीगाळ करून, कट मारून उडवून देण्याची धमकी.

Abuse, threat to village servant A crime against three

अकोले: कोतुळचे ग्रामविकास अधिकारी शरद मार्तंड वावीकर यांना गौणखनिजाबाबत ना हरकत दाखल्यावरून अरेरावी करत शिवीगाळ करून, कट मारून उडवून देण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सीताराम काशिनाथ देशमुख, तसेच शंकर रामदास घोलप, धनंजय रमेश देशमुख, बाळासाहेब जयराम देशमुख (रा. कोतूळ) यांच्या विरोधात अकोले पोलिस स्टेशनमध्ये भा.द.वि.कलम १८६, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादीत म्हटले आहे,  की सोमवारी कोतुळ ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना दुपारी चार वाजल्याच्या सुमारास कोतूळ गावातील शंकर रामदास घोलप, धनंजय रमेश देशमुख हे गौणखनिजाबाबतचा ना हरकत दाखला घेण्याकरिता माझ्याकडे आले व आम्हाला लगेच ना हरकत दाखला द्या, असे बोलले. म्हणून मी त्यांना सांगितले की, माझी उद्या मिटिंग आहे. तुम्ही दोन दिवसांनी जागेचे उतारे घेऊन या व ना हरकत दाखला घेऊन जा. त्यांनी माझ्याशी अरेरावीची भाषा करून, तू आमच्यासाठी नोकर आहेस. तू ऑफिसला येऊ नको, असे म्हणून मला शिवीगाळ करून, तू येथे कसा राहतो हेच पाहतो, असा दम दिला. त्यांनी फोन करून लगेच बाळासाहेब जयराम देशमुख, सीताराम काशिनाथ देशमुख यांना बोलावून घेतले व त्यांनी मला कॅबिनमध्ये बोलावले. तुम्ही दाखला का देत नाही असे म्हणून त्यांनीही शिवीगाळ करून मला कट मारून उडवून देऊ अशी धमकी दिली.

१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अभ्यासक्रम, इंग्रजी ग्रामर आणि बरेच काही – एजुकेशन पोर्टल 

या वेळी माझे कार्यालयाचे आपरेटर देशमुख व शिपाई गोडे, पाणीपुरवठा कर्मचारी आरोटे हे हजर होते. त्यांनी संबंधित लोकांची समजूत काढली; परंतु ते ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते. म्हणून शंकर रामदास घोलप, धनंजय रमेश देशमुख, बाळासाहेब जयराम देशमुख, सीताराम काशिनाथ देशमुख यांच्याविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून भा.द.वि.कलम १८६, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Abuse, threat to village servant A crime against three

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here