Home जालना जातीचे वैधता प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी लाच, संशोधक सहाय्यक रंगेहाथ ताब्यात

जातीचे वैधता प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी लाच, संशोधक सहाय्यक रंगेहाथ ताब्यात

जात पडताळणी समितीच्या कार्यालयातील संशोधक सहाय्यकानी मुस्लिम तेली जातीचे वैधता प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी लाच (Bribe)  मागितल्याची घटना समोर आली आहे.

Bribe to verify caste validity certificate, arrest research assistant 

जालना : जालन्यातील जात पडताळणी समितीच्या कार्यालयातील संशोधक सहाय्यकानी मुस्लिम तेली जातीचे वैधता प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी लाच मागितली. ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.

जालन्यातील तक्रादार यांनी मुस्लिम तेली जातीचे वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी जात पडताळणी समितीच्या कार्यालयात अर्ज दाखल केला होता. नियमानुसार त्यांनी सर्व पुरावे सुद्धा कार्यालयात जमा केले होते. दरम्यान मुस्लिम तेली जातीचे वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी त्यांना विलंबी होत असल्याने तक्रादार यांनी जात पडताळणी समितीच्या कार्यालयात वारंवार चकराही मारल्या होत्या. त्याच दरम्यान कार्यालयातील संशोधक सहाय्यक राहूल बनसोडे यांनी त्यांना प्रमाणपत्र वैधतेसाठी लाच मागितली.

तक्रादार यांना लाच देण मान्य नसल्याने त्यांनी या बाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर तडजोडीअंती ३५ हजाराची लाच देण्याचे ठरल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी आज पंचांच्या समक्ष संशोधक सहाय्यक राहूल बनसोडे याला रंगेहात लाच स्वीकारताना पकडून ताब्यात घेत त्याच्या विरुद्ध कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

Web Title: Bribe to verify caste validity certificate, arrest research assistant 

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here