Home क्राईम महाविद्यालयीन युवतीवर मद्य पाजून बलात्कार; डॉक्टरविरुद्ध गुन्हा

महाविद्यालयीन युवतीवर मद्य पाजून बलात्कार; डॉक्टरविरुद्ध गुन्हा

Pune Crime: सोशियल मेडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या महाविद्यालयीन युवतीला मद्य पाजून तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याची घटना.

rape of college girl A crime against a doctor

पुणे: सोशियल मेडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या महाविद्यालयीन युवतीला मद्य पाजून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एका डॉक्टरविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. शुभंकर महापुरे (वय २६,रा. विजया अलंकार सोसायटी, तळजाई पठार, धनकवडी)  असे गु्न्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. याबाबत एका युवतीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दररोजच्या बातम्या  मिळविण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा. संगमनेर अकोले न्यूज

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पीडित युवती परगावची आहे. ती पुण्यात शिक्षणासाठी आली आहे. समाजमाध्यमातून त्याची युवतीशी ओळख झाली होती. त्यानंतर त्याने युवतीला जाळ्यात ओढले. त्याने जेवणासाठी तिला नारायण पेठेतील कार्यालयात बोलावून घेतले. जेवण करण्यापूर्वी त्याने तिला मद्य पाजले. मद्य प्यायल्याने युवतीला गुंगी आली. त्यानंतर डॉ. महापुरे याने तिच्यावर बलात्कार केला. घाबरलेल्या युवतीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक साळुंखे पुढील तपास करत आहेत.

Web Title: rape of college girl A crime against a doctor

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here