Home नागपूर पाणीपुरी खाण्याच्या बहाण्याने बोलविले अन अत्याचार केला

पाणीपुरी खाण्याच्या बहाण्याने बोलविले अन अत्याचार केला

Breaking News | Nagpur Crime: पाणीपुरी खाण्याच्या बहाण्याने बोलविले व त्यानंतर तिला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार (abused).

Called and abused on the pretext of eating Panipuri

नागपूर : एका आरोपीने अल्पवयीन मुलीला पाणीपुरी खाण्याच्या बहाण्याने बोलविले व त्यानंतर तिला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

श्याम उर्फ बिट्टू प्रशांत बेलखोडे (२४, जय जलाराम नगर, खरबी) असे आरोपीचे नाव आहे. त्याची नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका १५ वर्षीय विद्यार्थिनीशी ओळख झाली. त्याने तिला मैत्रीच्या जाळ्यात ओढले. १९ जानेवारी रोजी त्याने तिला पाणीपुरी खाण्यासाठी हसनबाग येथे बोलविले. त्यानंतर त्याने तिला मोटारसायकलवर बसवून वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कूलर कंपनीजवळ नेले व तेथे तिच्यावर अत्याचार केला.

या प्रकारामुळे मुलगी घाबरली. ती काही दिवस गप्प राहिली. मात्र हिंमत दाखवून तिने कुटुंबियांना या प्रकाराची माहिती दिली. तिच्या तक्रारीवरून वाठोडा पोलीस ठाण्यात आरोपी श्यामविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Called and abused on the pretext of eating Panipuri

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here