फोटोग्राफरची भरदिवसा घरात घुसून गोळ्या झाडून हत्या
Breaking News | Nagpur Crime : एकाची बंदुकीच्या गोळ्या घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर.
नागपुर: नागपूरात सदर पोलीस स्टेशन हद्दीत राजनगर येथे एकाची बंदुकीच्या गोळ्या घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विनय पूनेकर असे हत्या झालेल्या फोटोग्राफरचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी की, विनय पूनेकर हे घरी एकटे असताना एक व्यक्ती आला आणि सायलेन्सर लावलेल्याने पिस्टलने त्यांच्यावर गोळी झाडून पळून गेला.
मृत पूनेकर यांना प्रेस फोटोग्राफर म्हणून काम सोडून अनेक वर्षे झाले आहेत. दरम्यान त्यांच्या घरात घुसून काहींनी गोळ्या झाडून त्यांची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हत्येचे कारण अद्याप समोर आले नसून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
Web Title: photographer was shot and killed by breaking into his house in broad daylight
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study