Home संगमनेर संगमनेर: प्रवरा नदीपात्रात वाळूची दोन वाहने पकडली

संगमनेर: प्रवरा नदीपात्रात वाळूची दोन वाहने पकडली

Breaking News | Sangamner: नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई, ६ लाख १५ हजाराचा मुद्देमाल जप्त.

Two vehicles of sand caught in Pravara river bed

संगमनेर: खांडगाव शिवारातील प्रवरा नदीपात्रात नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे दोन पिकअप वाहन पकडले. या कारवाईत एकूण ६ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई शनिवार दि. २४ फेब्रुवारी पहाटे केली. यामुळे आता स्थानिक महसूल व पोलीस यंत्रणा नेमकी काय करते असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

खांडगाव शिवारातील प्रवरा नदीपात्रात अवैधरित्या वाळूचा उपसा करून ही वाळू पिकअमध्ये चोरून भरली जात असल्याची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना समजली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन आडबल यांच्या पथकाने शनिवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास नदी पात्रात येवून ही कारवाई केली. यावेळी रमेश काळे, सुनील बोऱ्हाडे, बबलू सातपुते हे तिघेजण पोलिसांना पाहून पळून गेले. या कारवाईत ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

दुसरी कारवाई पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे यांच्या पथकाने सव्वा तीन वाजेच्या सुमारास खांडगाव शिवारातील प्रवरा नदीपात्रातच केली आहे. याही ठिकाणी पिकअपमधून अवैधरित्या वाळूची वाहतूक करताना पकडले. यावेळी शुभम थोरात, संतोष ढगे हे दोघेही पोलिसांना पाहून पळून गेले. या कारवाईतही एकूण ३ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही कारवाईत पोलिसांनी ६ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन आडबल व दत्तात्रय गव्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी वरील पाच जणांविरुद्ध भादंवि कलम ३७९ सह पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.

Web Title: Two vehicles of sand caught in Pravara river bed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here