अहमदनगर: चुलत भावाचा भोसकून खून करणाऱ्या गुंडाला जन्मठेप
Breaking News | Ahmednagar: चुलत भावाचा चाकूने भोसकून खून करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश भुजंगराव पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा.
कोपरगाव : चुलत भावाचा चाकूने भोसकून खून करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश भुजंगराव पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याप्रकरणी प्रत्यक्षदर्शी फिर्यादी व मृताच्या भाचीची साक्ष महत्त्वपीर्ण ठरली. ही घटना ६ वर्षांपूर्वी राहाता तालुक्यातील लोणी परिसरात प्रवरानगर येथे घडली होती.
याप्रकरणी कुणाल राजेंद्र भोसले याने आरोपीविरुध्द फिर्याद दिली होती. १७ मे २०१८ रोजी सायंकाळी प्रवरानगर येथे जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरु असताना रात्री ८:१७ वाजेचे सुमारास नरेंद्र राजेंद्र भोसले व भाची स्नेहल विलास चव्हाण घराकडे चालले होते. यावेळी प्रवरानगर येथील कुख्यात गुंड लाला रंजन भोसले याने दोघांना अडविले. नरेंद्र यास शिवीगाळ करून मागील कारणावरून, ‘तुला आता संपवतोच,’ असे म्हणत त्यांच्या पोटात चाकूने वार केले. यावेळी स्नेहल मध्ये पडली असता, तिच्या हातावर चाकूचा वार लागला. तिच्या हाताच्या शिरा कापल्या. दरम्यान, नरेंद्र यांचा उपचार सुरू असताना २२ मे २०१८ रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपींविरुद्ध लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स. फौजदार एस. एन. माळी यांनी कोर्टकामी पैरवी केली.
खटल्याच्या सुनावणीत सरकारी वकील अशोक वहाडणे व लिपीक श्रीनिवास जोशी यांनी १७ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. फिर्यादी कुणाल भोसलेसह स्नेहल चव्हाण या दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने आरोपी लाला रंजन भोसले यास कलम ३०२, अन्वये जन्मठेप व १० हजार रु. दंड, दंड न भरल्यास ३ महिन्यांची शिक्षा सुनावली. कलम ३२४ अन्वये १ वर्षे शिक्षा व ५ हजार दंडाची शिक्षा दिली दंड न भरल्यास १ महिना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
Web Title: Life imprisonment for the gangster who stabbed his cousin to death
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study