Home राष्ट्रीय ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात कोसळल्याने, भीषण अपघातात २४ ठार

ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात कोसळल्याने, भीषण अपघातात २४ ठार

Breaking News | UP Accident: माघ पौर्णिमेनिमित्त गंगास्नानासाठी जाणाऱ्या भाविकांची ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात कोसळल्याने शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात (Accident) २४ ठार.

24 killed in horrific accident as tractor-trolley plunges into lake

कासगंज : माघ पौर्णिमेनिमित्त गंगास्नानासाठी जाणाऱ्या भाविकांची ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात कोसळल्याने शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात २४ ठार तर १५ ते २० जण जखमी झाले. उत्तरप्रदेशच्या कासगंज जिल्ह्यात शनिवारी सकाळी ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये महिला व बालकांची संख्या जास्त आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांबद्दल शोक व्यक्त केला. मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश योगींनी दिले आहेत.

माघ पौर्णिमेनिमित्त एटा जिल्ह्यातील जैथरा येथील ५० हून जास्त भाविक गंगास्नानासाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीने कासगंजकडे जात होते. यादरम्यान पटियाली-दरियावगंज मार्गावर एक वाहनाला ओव्हर टेक करण्याच्या नादात चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे अनियंत्रित झालेली ट्रॅक्टर-ट्रॉली रस्त्यालगतच्या सात ते आठ फूट खोल दलदलयुक्त तलावात कोसळली.

बचाव अभियानादरम्यान १५ ते २० जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. कासगंजमधील दुर्घटनेतील जीवित हानी अत्यंत हृदयद्रावक असल्याचे आदित्यनाथ यांनी एक्सद्वारे म्हटले. माझ्या संवेदना पीडितांच्या नातेवाइकासोबत आहेत. सर्व जखमींना योग्य व मोफत उपचार उपलब्ध करुन देण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. मृतांच्या आत्म्याला शांती लाभावी व जखमींनी लवकर बरे व्हावे, यासाठी मी प्रभू श्रीरामाकडे प्रार्थना करतो, असे योगींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Web Title: 24 killed in horrific accident as tractor-trolley plunges into lake

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here