संगमनेर तालुक्यात घाटात मालवाहतूक टेम्पोला भीषण आग
Sangamner Tempo Fire: शिरापूर घाटात मालवाहतूक टेम्पोला भीषण आग लागल्याची घटना.
संगमनेर: तालुक्यातील पिंपळगाव देपा येथील शिरापूर घाटात मालवाहतूक टेम्पोला भीषण आग लागल्याची घटना शनिवार दि. १४ जानेवारी दुपारी २:३० वाजेच्या दरम्यान घडली आहे. आगीत टेम्पो जळून खाक झाला आहे. मालवाहतूक टेम्पो हा शिरापूर घाटातून पिंपळगाव देपा गावाकडे येत होता.
घाट चढून टेम्पो वर आला असता त्याचवेळी टेम्पोला अचानक भीषण आग लागली. यावेळी आगीने रौद्ररूप धारण केले. टेम्पोचे आगीत मोठे नुकसान झाले आहे. टेम्पोला आग लागल्याची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर संगमनेर नगरपालिकेचा अग्नीशमन बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाला आणि आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान ही आग कशाने लागली हे मात्र समजू शकले नाही.
Web Title: cargo tempo caught fire at the wharf in Sangamner
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App