Home महाराष्ट्र ठरलं तर! नाशिक पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीचा शुभांगी पाटलांना पाठिंबा

ठरलं तर! नाशिक पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीचा शुभांगी पाटलांना पाठिंबा

Nashik Graduate Election: निवडणुकीत नवा ट्विट, महाविकास आघाडीतर्फे अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यात आला.

Mahavikas Aghadi supports Shubhangi Patal in Nashik graduate election

Nashik Graduate Election :  गेल्या काही दिवसांपासून नाशिक पदवीधर निवडणुकीचे राज्याच्या राजकारणात चांगलीच धूमचक्री पाहायला मिळाली आहे.  महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार सत्यजित तांबे यांनी ऐनवेळी अपक्ष म्हणून अर्ज भरल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता या निवडणुकीत नवा ट्विट आला आहे.

या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यात आला आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक पदवीधर मतदार संघ आता ठाकरे गट लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपात असलेल्या शुभांगी पाटील यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे, सुभाष देसाई यांच्यासह महत्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र आता शिवसेनेच्या या निर्णयाला महाविकास आघाडी पाठिंबा देणार की,  शुभांगी पाटील यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीमध्येच वाजणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Web Title: Mahavikas Aghadi supports Shubhangi Patal in Nashik graduate election

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here