Home Accident News कंटेनर  व मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात, एक ठार, तब्बल शंभर फुटावर ओढत...

कंटेनर  व मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात, एक ठार, तब्बल शंभर फुटावर ओढत नेले

Ahmednagar Accident:  मोटर सायकल व कंटेनरच्या भीषण अपघात, कंटेनर चालकांने त्यांना तब्बल शंभर फुटावर ओढत नेले. एका जण ठार.

accident between container and motorcycle, one killed

कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द फाटा येथे पुणतांबा फाटा ते झगडे फाटा या रोडवर मोटर सायकल व कंटेनरच्या भीषण अपघात झाला असून यामध्ये एका जणाचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात कोपरगाव वकील संघाचे सदस्य ॲड साहेबराव देवराम औताडे (वय 62) वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला आहे. औताडे हे कामानिमित्त कोपरगाव कडे जात कोपरगाव वरून येणाऱ्या कंटेनरने त्यांना जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कंटेनर चालकांने त्यांना तब्बल शंभर फुटावर ओढत नेले.

स्थानिक नागरिकांनी कंटेनर ताब्यात घेतला असून चालक मात्र पसार झाला आहे. औताडे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती निधनाने पोहेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: accident between container and motorcycle, one killed

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here