Home महाराष्ट्र Accident: सिन्नर शिर्डी अपघातप्रकरणी मोठी अपडेट, ट्रक चालकास…

Accident: सिन्नर शिर्डी अपघातप्रकरणी मोठी अपडेट, ट्रक चालकास…

Sinnar Shirdi Accident Update:   बस ट्रक अपघात, १० जणांचा मृत्यू, ट्रक चालक फरार झाला होता. सिन्नर पोलिसांनी चालकास जेरबंद केलं आहे.

Big update on Sinner Shirdi accident case

सिन्नर: अंबरनाथच्या मोरीवली गावातून शिर्डीला  जायला निघालेल्या भाविकांच्या बसला सिन्नर शिर्डी महामार्गावरील पाथरे गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जण मृत्युमुखी पडले असून यात मोरीवली गावातील बहुतांशी रहिवाशांचा समावेश आहे. त्यामुळे मोरीवली गावावर शोककळा पसरली आहे.  या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला होता. या ट्रक चालकास सिन्नर पोलिसांनी अखेर ताब्यात (Arrested) घेतले आहे.

 आज सकाळी सहा साडे सहाच्या सुमारास सिन्नर – शिर्डी महामार्गावर खासगी बस व यांच्यात भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की बसची एक बाजूच निखळून पडल्याचे घटनास्थळी दिसून येत होते या अपघातात दहा प्रवाशांचा मृत्यू झाला. तर अपघातानंतर ट्रकचालक हा फरार झाला होता दरम्यान काही वेळापूर्वीच फरार ट्रक चालक सखाराम बल्लाळला औरंगाबाद येथून काही वेळापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले.

वावी पोलिसांनी तातडीने तापसचक्रे फिरवत सखाराम बल्लाळ यास औरंगाबाद येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Web TitleBig update on Sinner Shirdi accident case

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here