Home क्राईम विवाहितेचा अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करीत वारंवार अत्याचार

विवाहितेचा अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करीत वारंवार अत्याचार

Rape Case: विवाहित महिलेचा अश्लील व्हिडियो काढून ब्लॅकमेल करीत बळजबरीने वारंवार तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

Rape by blackmailing the married woman by taking obscene videos

वर्धा: विवाहितेचा अश्लील व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करीत बळजबरीने वारंवार तिच्यावर अत्याचार (Sexually abused) केला. अखेर त्रस्त होवून पीडितेने याबाबतची तक्रार अमरावती पोलिसात दिली. घटनास्थळ रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने अमरावती पोलिसांनी तक्रार पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठविली. पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये रामनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

विवाहिता ही पतीला न सांगता वर्धा येथील म्हाडा कॉलनीतील रहिवासी तिच्या मैत्रिणीकडे ३० ऑक्टोबर २०२२ रोजी आली होती. मैत्रिणीच्या आजीला भेट देण्यासाठी पीडिता ही स्वयंपकखोलीत कपडे बदलवित असतानाच आरोपी राकेश आडे रा. म्हाडा कॉलनी पाण्याच्या टाकीजवळ याने पीडितेचा विवस्त्र व्हिडीओ स्वतहाच्या मोबाईलमध्ये काढून तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ब्लॅकमेल करु लागला.

पीडितेने नकार दिला असता व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेशी वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करुन पीडितेच्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिली. अखेर पीडितेने सततच्या त्रासाला कंटाळून अमरावती येथील पोलीस ठाण्यात आरोपी राकेश आडे याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

घटनास्थळ रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने तक्रार पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली. पोलीस अधीक्षक कार्यालयातून ती तक्रार रामनगर पोलिसांना प्राप्त झाल्याने पोलिसांनी आरोपी राकेश आडे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Rape by blackmailing the married woman by taking obscene videos

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here