Home क्राईम संगमनेर: महिलेचे अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत पैशाची मागणी, खंडणीचा गुन्हा

संगमनेर: महिलेचे अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत पैशाची मागणी, खंडणीचा गुन्हा

Sangamner Crime:  जर मला सहा लाख रुपये दिले नाही (extortion) तर मी तुमच्यावर गुन्हा दाखल करेल व तुमचे अश्लील व्हिडिओ प्रसारित करेल अशी धमकी.

Threatening to broadcast obscene video of woman, demanding money, extortion offense

संगमनेर : संगमनेर शहरातील येथील एका महिलेला तुमच्याबद्दल माझ्याकडे अनेक तक्रारी आहेत, तसेच तुमचे अश्लील व्हिडिओ देखील आहे. तुम्ही जर मला सहा लाख रुपये दिले नाही तर मी तुमच्यावर गुन्हा दाखल करेल व तुमचे अश्लील व्हिडिओ प्रसारित करेल अशी धमकी दिली. याप्रकरणी सदर महिलेने फिर्याद दिल्यानंतर एकावर शहर पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका चौकात राहणाऱ्या महिलेची शौकत पठाण या व्यक्तीशी ओळख होती. दरम्यान शौकत पठाण याने माझ्याकडे तुमच्या विरोधात तक्रारी आल्या आहेत. तुम्ही लोकांना त्रास देता याचे पुरावे म्हणून माझ्याकडे व्हिडीओ शुटींग, रेकॉर्डींग तसेच तुमचे अश्लील फोटो माझ्याकडे आहेत. त्याबदल्यात मला ६ लाख रूपये द्या. नाहीतर मी पोलीस स्टेशनमध्ये तुमची तक्रार करेल असे म्हणून पठाण याने या महिलेकडे पैशांची मागणी केली. या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात शौकत पठाण याच्याविरूद्ध गुन्हा रजि. नं. ४५/२०२३ भादंवि ३८४ प्रमाणे दाखल करण्यात आला.

Web Title: Threatening to broadcast obscene video of woman, demanding money, extortion offense

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here