Home अहमदनगर बनावट डिझेल प्रकरणी मुख्य सूत्रधार व त्याच्या मुलाला अटक

बनावट डिझेल प्रकरणी मुख्य सूत्रधार व त्याच्या मुलाला अटक

Chief facilitator and his son arrested in fake diesel case

अहमदनगर: बुधवारी रात्री डिझेल रॅकेटमधील मुख्य सूत्रधार शब्बीर देशमुख व मुलगा मुदस्सर देशमुख यांना अटक केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गाजत असलेल्या बनावट डिझेल प्रकरणातील कारवाई ही पोलीस अधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

राहता तालुक्यात लोणी येथून रात्री या दोघांना ताब्यात घेण्यात आले. आज गुरुवारी सकाळी या दोघांना जिल्हा जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

नगर शहरातील जीपीओ चौकात अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या पथकाने छाफा टाकून बनावट डिझेल जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी शहर विभागाचे अधीक्षक विशाल ढुमे हे करीत आहे. मात्र या तपासात प्रगती न झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी उपाधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे तपास वर्ग करण्यात आला होता. हा तपास वर्ग केल्यानंतर चार दिवसांतच मिटके यांनी मुख्य सूत्रधाराला ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात अजून आणखी आरोपी वाढण्याची शकयता वर्तविण्यात येत आहे. आता जिल्ह्यात कोठे डिझेल वितरीत होत होते. कोठून येत होते याचीही माहिती उघडकीस येईल.

Web Title: Chief facilitator and his son arrested in fake diesel case


कडाक्याच्या थंडीत करा विजेची बचत, पैशाची बचत, आजच बसवा सोलर वॉटर हिटर, नामांकित कंपनीचे (V-Guard, Supreme) सोलर वॉटर हिटर मिळण्याचे एकमेव ठिकाण आर.पी.डी. एनर्जी. संगमनेर, दिवाळीनिमित्त खास ऑफर्स सुरु. संपर्क: 9850540436

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here