Home महाराष्ट्र बॉलीवूड अभिनेता असिफ बसरा यांची कुत्र्याच्या पट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या

बॉलीवूड अभिनेता असिफ बसरा यांची कुत्र्याच्या पट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या

Asif Basra commits Sucide Today 

बॉलीवूडला आणखी एक धक्का बसला आहे. हरहुन्नरी अभिनेता असिफ बसरा याने हिमाचल प्रदेशाच्या कांगडा जिल्ह्यातील धर्मशाळा येथे गळफास घेऊन आज गुरुवारी आत्महत्या केली आहे. त्याच्या आत्महत्यामागील कारण मात्र अजून समजू शकले नाही. आसिफ बसरा हे ५३ वर्षाचे होते. त्यांनी हे टोकाचे पाउल उचलल्याने बॉलीवूडला धक्का बसला आहे.

असिफ बसरा हे गुरुवारी दुपारी आपल्या पाळीव कुत्र्याला घेऊन फिरायला गेले होते. घरी आल्यावर कुत्र्याच्या पट्ट्याने गळफास घेतला. गेल्या काही दिवसांपासून असिफ हा डिप्रेशनमध्ये दिसत होता.

एका रिपोर्टनुसार, असिफ बसरा हे एका भाड्याच्या घरात राहत होते. त्यांच्यासोबत एक विदेशी महिला लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती अशी चर्चा आहे.

असिफ बसरा यांनी बॉलीवूडच्या बऱ्याच सिनेमांमध्ये काम केले होते. हॉलीवूड सिनेमांमध्ये सुद्धा त्याने काम केले होते. हिमाचली सिनेमात सांझ मधील त्यांचा अभिनय गाजला होता.  

Web Title: Asif Basra commits Sucide Today 


कडाक्याच्या थंडीत करा विजेची बचत, पैशाची बचत, आजच बसवा सोलर वॉटर हिटर, नामांकित कंपनीचे (V-Guard, Supreme) सोलर वॉटर हिटर मिळण्याचे एकमेव ठिकाण आर.पी.डी. एनर्जी. संगमनेर, दिवाळीनिमित्त खास ऑफर्स सुरु. संपर्क: 9850540436

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here