Home अहमदनगर विद्यार्थिनीला धमकी देत वेळोवेळी बलात्कार, गुन्हा दाखल

विद्यार्थिनीला धमकी देत वेळोवेळी बलात्कार, गुन्हा दाखल

Rape from time to time threatening the student

अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर शहरातील विद्यार्थी तरुणीला धमकी देत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

आरोपी रोशन हेमंत शिंदे रा. ब्राम्हणगल्ली भिंगार या तरुणाने २१ वर्ष वयाच्या तरुण विद्यार्थिनीला तू माझ्या सोबत चाल नाहीतर मी तुझ्या भावाला ठार मारीन, स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून आत्महत्या करील अशी धमकी देण्यात आली. मात्र या तरुणीने त्यास प्रतिसाद दिला नाही. तेव्हा त्याने त्याच्याजवळील रॉकेल अंगावर ओतून घेतले. व पेटून घेतो असा म्हणाला.तेव्हा ही विद्यार्थिनी घाबरली आणि ती भीतीपोटी रोषण शिंदे बरोबर गेली. रोशन शिंदेने या तरुणीला थेट गुलबर्गा येथे त्याच्या मावशीच्या घरी नेले. तिथे त्याने तिच्या इच्छेविरुद्ध मावशीच्या घरात अनेकवेळा बलात्कार केला. सदर प्रकार ३० सप्टेंबर ते ७ नोव्हेंबर या दरम्यान घडला.

याप्रकरणी पिडीत तरुणीने काल भिंगार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपी रोशन हेमंत शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिंडे हे अधिक तपास करीत आहेत.  

कडाक्याच्या थंडीत करा विजेची बचत, पैशाची बचत, आजच बसवा सोलर वॉटर हिटर, नामांकित कंपनीचे (V-Guard, Supreme) सोलर वॉटर हिटर मिळण्याचे एकमेव ठिकाण आर.पी.डी. एनर्जी. संगमनेर, दिवाळीनिमित्त खास ऑफर्स सुरु. संपर्क: 9850540436

Web Title: Rape from time to time threatening the student

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here