Home अकोले कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता: डॉ. शाम शेटे

कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता: डॉ. शाम शेटे

Second wave of corona likely to come to Sham Shete

अकोले प्रतिनिधी: कोरोना संपला या भ्रमात कोणीही राहू नये,कोरोणाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वांनी मास्क वापरणे,सोशल डिस्टनसिंग चे पालन करणे व वेळोवेळी हात स्वच्छ धुणे ही काळजी घ्यावी.

विशेष करून तरुणांनी फार निष्काळजीपणा दाखवू नये,कारण तुमची प्रतिकारशक्ती चांगली असली तरी आपल्या आई वडिलाच्या,आजी आजोबांच्या आरोग्याची काळजी घेणे ही तुमची जबाबदारी आहे हे लक्षात ठेवावे असे प्रतिपादन प्रा.आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तथा कोव्हीड 19 सेन्टर चे नोडल ऑफिसर डॉ. शाम शेटे यांनी केले.

 अकोले येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना कोरोनविषयी मार्गदर्शन करतांना प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.शेटे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विद्याचंद्र सातपुते हे होते.यावेळी पत्रकार अल्ताफ शेख,गट निदेशक मच्छिन्द्र गायकर,निदेशक ,कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

 डॉ.शेटे पुढे मार्गदर्शन करताना म्हणाले की, सध्या सणासुदीचे दिवस असल्याने बाजार पेठे मध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी असून सोशल डिस्टनसिंग पाळताना कोणी दिसत नाही,त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका जास्त असून दीपावली नंतर कोरोणाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे.युवक वर्ग कोरोना संपला या अविर्भात निष्काळजीपणा दाखवत आहे.त्याचा धोका आपल्या कुटुंबाला होऊ शकतो.सर्वांनी वेळच्या वेळी जेवण करावे,घराच्या बाहेर पडताना काहीतरी खाऊनच बाहेर पडावे आय टी आय च्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टीकल करताना विशेष काळजी घ्यावी,आपण वापरत असलेले साधने,हत्यारे यांना आला वर्ग मित्र हाताळीत असतांना त्यामुळे कोरोना संसर्ग वाढू शकतो,त्यासाठी वेळोवेळी हात सॅनिटायझर करावे,आपल्याजवळ सॅनिटायझर ची बाटली ठेवावी,एकमेकांशी बोलताना मास्क लावूनच बोलावे,मोटरसायकल वर शक्यतो आपण एकटेच असावे. दोघांमध्ये एक ये दीड मिटर अंतर ठेवावे.आपल्याला काही त्रास जाणवत असेल तर तातडीने सरकारी दवाखान्याशी संपर्क साधावा.आपले कुटुंब आपली जबाबदारी या प्रमाणे वागावे.कोरोनाला घाबरू नये,आपली प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी योगासने करावीत,सकस आहार घ्यावा.घरच्या माणसांना ही काळजी घेण्यास सांगावे.असे मार्गदर्शन करताना कोरोणाची लक्षनाबद्दल माहिती देवीं त्याविषयीची काळजी कशी घ्यावी याविषयीची माहिती दिली.दररोज वेळोवेळी ऑक्सिमिटर ने ऑक्सिजन तपासणे,ताप पाहणे ही कामे करावीत. यावेळी उपस्थित शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी काही प्रश्न विचारून आपल्या शंकेचे निरसन करून घेतले.

प्रास्ताविक  प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी केले तर आभार गट निदेशक मच्छिन्द्र गायकर यांनी मानले.

Web Title: Second wave of corona likely to come to Sham Shete

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here