Home संगमनेर संगमनेर तालुक्यात मंगळवारी २७ करोनाबाधित

संगमनेर तालुक्यात मंगळवारी २७ करोनाबाधित

Sangamner Taluka 27 coronavirus infected Tue

संगमनेर | Sangamner: मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात 27 व्यक्तींचे अहवाल करोनाबाधित आढळून आले आहेत. शहरात 16 जणांचे तर ग्रामीण भागात 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

शहरातील जनतानगर येथील 50 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय महिला, सावतामाळी नगर येथील  72 वर्षीय पुरुष, 67 वर्षीय महिला,  मालदाड रोड येथे 78 वर्षीय पुरुष, 49 वर्षीय पुरुष, 20 वर्षीय तरुण, 45 वर्षीय महिला, श्रमगाथा सोसायटीतील 63 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष,  वाडेकर गल्ली 45 वर्षीय पुरुष, 41 वर्षीय महिला, नेहरु चौक 50 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथील 69 वर्षीय पुरुष, खंडोबा गल्ली 49 वर्षीय महिला करोनाबाधित आढळून आले आहेत.  

ग्रामीण भागातून घुलेवाडीतील 55 वर्षीय पुरुष, आश्वी बु. येथील 21 वर्षीय तरुणी, चिंचोली गुरव येथील  67 वर्षीय पुरुष, मनोली येथे 33 वर्षीय पुरुष, सुकेवाडी येथील 58 वर्षीय महिला, 39 वर्षीय पुरुष, समनापूर येथील 70 वर्षीय पुरुष, 63 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथील 69 वर्षीय, गोल्डनसिटी येथील 60 वर्षीय महिला, धांदरफळ खुर्द येथील  20 वर्षीय तरुणी असे बाधित आढळून आले आहेत.

Web Title: Sangamner Taluka 27 coronavirus infected Tue


कडाक्याच्या थंडीत करा विजेची बचत, पैशाची बचत, आजच बसवा सोलर वॉटर हिटर, नामांकित कंपनीचे (V-Guard, Supreme) सोलर वॉटर हिटर मिळण्याचे एकमेव ठिकाण आर.पी.डी. एनर्जी. संगमनेर, दिवाळीनिमित्त खास ऑफर्स सुरु. संपर्क: 9850540436


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here