Home बीड धक्कादायक! भाजपाचे शहराध्यक्ष यांनी स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

धक्कादायक! भाजपाचे शहराध्यक्ष यांनी स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

Beed Suicide News: स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना.

city president of BJP committed suicide by shooting himself

बीड: भाजपाचे बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज घडली आहे.  त्यांना शहरातील एका रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र  उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

भाजपचे शहराध्यक्ष असलेले भगीरथ बियाणी हे सतत सामाजिक कार्यात अग्रेसर होते. आज सकाळी त्यांनी स्वतःवर गोळी झाडली होती. त्यांनतर त्यांच्यावर शहरातील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

भगीरथ बियाणी यांनी नेमकी आत्महत्या का केली ? याचं कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान भगीरथ बियाणे यांची भाजपचा कट्टर कार्यकर्ता म्हणून ओळख होती. त्यामुळे बीड शहरासह जिल्ह्यात आता हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: city president of BJP committed suicide by shooting himself

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here