Home अहमदनगर अल्पवयीन मुलीचे फोटो सोशियल मेडीयावर व्हायरल करून बदनामी

अल्पवयीन मुलीचे फोटो सोशियल मेडीयावर व्हायरल करून बदनामी

Ahmednagar Crime: फोटो सोशियल मेडीयावर व्हायरल केल्याप्रकरणी तिघांवर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

Crime Defamation by viralizing the photos of a minor girl on social media

अहमदनगर:  अल्पवयीन मुलीसोबत काढलेले फोटो सोशियल मेडीयावर व्हायरल केल्याप्रकरणी तिघांवर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नगर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे.  

दीपक शहादेव पवार, अमोल गोरख गायकवाड, राहुल बाळू वाघ (तिघे रा. हातवळण ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, 15 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान वेळोवेळी ही घटना घडली आहे. 15 सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता तिघांनी फिर्यादीला बळजबरीने गाडीत बसून श्रीगोंदा तालुक्यातील खाकीबा दर्गा येथे नेले. त्याठिकाणी दीपक पवार याने फिर्यादीसोबत बळजबरीने फोटो काढले. फिर्यादीला 16 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता घरी आणून सोडले. 17 सप्टेंबर रोजी फिर्यादीसोबत काढलेले फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल करून बदनामी केली.

यानंतर 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी फिर्यादी मंदिरात गेली असता वरील तिघांनी तिचा पाठलाग करून आमच्यासोबत येते का असे म्हटले. तसेच 7 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजता फिर्यादी घराच्या बाहेर पडवीत झोपलेली असताना वरील तिघांनी आमच्यासोबत येते का, असे म्हणून फिर्यादीला लज्जा उत्पन्न हाईल, असे वर्तन केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग करीत आहेत.

Web Title: Crime Defamation by viralizing the photos of a minor girl on social media

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here