Home महाराष्ट्र शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव तर मिळाले हे चिन्ह

शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव तर मिळाले हे चिन्ह

CM Eknath Shinde: बाळासाहेबांची शिवसेना गटाला ढाल तलवार (Two Swords & Shield Symbol) चिन्ह प्रदान.

CM Eknath Shinde group got the name Shiv Sena of Balasaheb

मुंबई:  बाळासाहेबांची शिवसेना या शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने ढाल- तलवार चिन्‍ह दिले आहे. मंगळवारी आयोगाने ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह जाहीर केले होते. तर शिंदे गटाला पुन्हा नवीन पर्याय सादर करण्यास सांगितले होते.

यानुसार शिंदे गटाने चिन्हासाठी आयोगाला उगवता सूर्य, ढाल- तलवार आणि वडाचे झाड हे तीन पर्याय ईमेलद्वारे सादर केले होते. यानंतर निवडणूक आयोगाकडून यामधीलच ढाल- तलवार हे चिन्ह ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या शिंदे गटाला जाहीर केले आहे. आयोगाने सायंकाळी साडे पाच वाजेच्या दरम्यान बाळासाहेबांची शिवसेना गटाला ढाल तलवार (Two Swords & Shield Symbol) चिन्ह प्रदान केलं आहे.

Web Title: CM Eknath Shinde group got the name Shiv Sena of Balasaheb

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here