Home क्राईम संगमनेर घटना: महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची छेडछाड करून मारहाण, मैं तुझसे प्यार करता हुँ…

संगमनेर घटना: महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची छेडछाड करून मारहाण, मैं तुझसे प्यार करता हुँ…

Sangamner Crime:  संगमनेरच्या एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या युवतीची वारंवार छेडछाड करून तिला मारहाण केल्याची घटना, तरुणाविरुद्ध विनयभंगाचा (Molested) गुन्हा दाखल.

College student molested and beaten

संगमनेर:  संगमनेरच्या एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या युवतीची वारंवार छेडछाड करून तिला मारहाण केल्याची घटना काल सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील मोमीनपुरा परिसरात राहणारी 21 वर्षीय युवती महाविद्यालयात एम .एस्सी. वर्गात शिक्षण घेत आहे. मागील एक महिन्यापासून फरहान सय्यद (रा. अलका नगर, संगमनेर) हा युवक तिला त्रास देत होता. सदर युवती महाविद्यालयात जात असताना रिक्षा स्टॉप व कॉलेजच्या प्रवेशद्वारासमोर येऊन रुक मुझे तेरे से बात करनी है मैं तुझसे प्यार करता हुँ असे म्हणून तो या युवतीला वारंवार टॉर्चर करीत होता. महाविद्यालयातील कोणत्या मित्र-मैत्रिणींसोबत बोलते, याबाबत तो पूर्णपणे लक्ष ठेवून राहत असे. तुझे कोणासोबत तरी अफेअर आहे. मी तुझ्या आई वडीलांना सांगतो अशी धमकी त्याने दिली होती. आई वडील शिक्षण बंद करतील म्हणून सदर युवतीने झालेला प्रकार घरात कोणाला सांगितला नाही.

काल दिनांक 18 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास सदर युवती कॉलेजला पेपर साठी पायी चालत असताना तेथे फरहान सय्यद याने तु किसके साथ जाती आती है, मुझे मालुम है, त्यावेळी त्याला तुझे क्या करने का मेरे साथ बात मत कर असे ही युवती त्याला म्हणाली. मै तुझसे प्यार करता हुँ, असे म्हणून त्याने या युवतीचा हात पकडून हाताने तोंडावर मारहाण केली. त्यावेळी तिने घाबरून घरी जाऊन आपल्या वडिलांना झालेला प्रकार सांगितला. यानंतर सदर युवतीने शहर पोलीस ठाण्यात फरहान सय्यद याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी सय्यद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

Web Title: College student molested and beaten

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here