Home महाराष्ट्र धक्कादायक! जंगलात झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या

धक्कादायक! जंगलात झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या

तलासरीजवळील बारड डोंगरावरील जंगलात झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Lovers committed suicide by hanging themselves from a tree in the forest

वसई विरार : तलासरीजवळील बारड डोंगरावरील जंगलात झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने दोन्ही कुटुंबात खळबळ उडाली आहे.

ललिता चंदऱ्या राहया (२०) आणि प्रदीप वनेश राजड (१९) अशी या प्रेमीयुगुलाची नावे असून ते दोन्ही तलासरी तालुक्यातील राहणारे होते.

मौजे करजगाव येथील बारड डोंगरावर जंगलातील झाडाला एकाच दोरीने दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे रविवारी ग्रामस्थांना आढळून आले.  त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. लग्नाला कुटुंबीयांचा विरोध असल्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

या दोघांचाही वेगवेगळ्या मुला आणि मुलीसोबत कुटुंबीयांनी लग्नाची बोलणी केल्याच्या रागातून या दोघांनीही आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच तलासरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व दोघांचेही मृतदेह खाली उतरवले. यासंदर्भात तलासरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तलासरी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Lovers committed suicide by hanging themselves from a tree in the forest

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here