Home अहमदनगर अहमदनगर: हॉटेलमधील वेटरचा मालकाने केला खून, विहिरीत फेकला मृतदेह

अहमदनगर: हॉटेलमधील वेटरचा मालकाने केला खून, विहिरीत फेकला मृतदेह

Ahmednagar Murder News:   जामखेड तालुक्यातील खर्डा  येथील हॉटेल पाटील येथील कामगाराचा खून ((Murder)) करून त्याचे प्रेत जिल्ह्याच्या सीमा भागातील मौजे पखरूड (जि. उस्मनाबाद) शिवारातील बेल्हेश्वर मंदिराच्या कमानी जवळील विहिरीत नेऊन फेकल्याचा प्रकार उघडकीस.

owner Murder the waiter in the hotel, threw the body in the well

जामखेड: जामखेड तालुक्यातील खर्डा  येथील हॉटेल पाटील येथील कामगाराचा खून ((Murder)) करून त्याचे प्रेत जिल्ह्याच्या सीमा भागातील मौजे पखरूड (जि. उस्मनाबाद) शिवारातील बेल्हेश्वर मंदिराच्या कमानी जवळील विहिरीत नेऊन फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी हॉटेल मालकासह तीघांना पोलीसांनी अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हॉटेल मालक अक्षय कातोरे (रा. खर्डा, ता. जामखेड), कामगार भरत आगलावे (रा ब्रह्मगाव ता. आष्टी जि. बीड) व शुभम एडके (रा. बुलढाणा) अशी गुन्हा दाखल  झालेल्या संशयितांची नावे आहेत. तर अनिकेत संजय उदमले (25, रा. आडगाव ता. पाथर्डी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 16 मे रोजी दुपारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मौजे पाखरूड शिवारातील बेलेश्वर मंदिराचे कमानी जवळील विहिरीत एका युवकाचा मृतदेह आढळून आला होता. वाशी (जि. उस्मनाबाद) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वाशी पोलीसांनी जवळील खर्डा येथील कोणी व्यक्ती हरवला आहे काय याचा तपास खर्डा पोलीसांच्या सहकार्याने केला असता त्यांना यातील मयत अनिकेत संजय उदमले याची माहिती मिळाली.

या माहितीच्या अधारे पोलीसांनी  तपास केला असता उदमले हा गेल्या आठ ते दहा दिवसांपासून खर्डा येथील हॉटेल पाटील पॅलेस येथे काम करीत होता. येथील कामाच्या वादातून हॉटेल मालक अक्षय कातोरे याने शिवीगाळ केली. तसेच त्याचे कामगार भरत आगलावे व शुभम एडके यांनी लाकडांनी मारहाण केली. त्या मारहाणीमध्ये अनिकेत मयत झाला असल्याचे समजताच तिघांनी मिळून संगमत करून अनिकेतचा मृतदेह एका ब्लँकेटमध्ये गुंडाळून जवळील विहिरीत पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने टाकून दिल्याची कबुली दिली. वाशी पोलीसांनी तीघांवर खुनाचा गुन्हा दाखल  केला आहे. संशयितांना तत्काळ अटक करण्यात आली असून हा गुन्हा खर्डा पोलीसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

Web Title: owner Murder the waiter in the hotel, threw the body in the well

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here