Home क्राईम अनैतिक संबंध पाहिल्यामुळे युवकाचा गळा आवळून खून

अनैतिक संबंध पाहिल्यामुळे युवकाचा गळा आवळून खून

Crime News: अनैतिक संबंध पाहिलेला युवक आता आपली बदनामी करेल म्हणून त्या दोघांनी सदरील तरुणाचा गळा आवळून आणि डोक्याच्या पाठीमागील बाजूस मारुन खून (Murder) केल्याची घटना.

Murder youth was strangled to death for witnessing an immoral relationship

लातूर | उदगीर : अनैतिक संबंध पाहिलेला युवक आता आपली बदनामी करेल म्हणून त्या दोघांनी सदरील तरुणाचा गळा आवळून आणि डोक्याच्या पाठीमागील बाजूस मारुन खून केल्याची घटना चिद्रेवाडी (ता. चाकूर) येथे सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी वाढवणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपींना अटक करुन गुरुवारी चाकूर न्यायालयासमोर हजर केले. तेव्हा न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

गणेश गोपीनाथ वस्तुरगे (३२, रा. चिद्रेवाडी, ता. चाकूर) असे मयत युवकाचे नाव आहे. वाढवणा पोलिसांनी सांगितले, आरोपी प्रदीप शंकर करडखेले (रा. खरबवाड़ी, ता. अहमदपूर) व उदगीर तालुक्यातील एका गावातील महिलेचे काही दिवसांपासून अनैतिक संबंध होते. दरम्यान, सोमवारी रात्री त्या दोघांचे अनैतिक संबंध पाहिल्याच्या कारणावरून त्यांनी संगनमत केले. आपल्या अनैतिक संबंधाची माहिती इतरांना सांगेल म्हणून गणेश गोपीनाथ वस्तुरगे (रा. चिंद्रेवाडी) याचा गळा आवळून आणि डोक्याच्या पाठीमागील बाजूस मारून खून केला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मुलाचा मृतदेह फरफटत नेला.

तसेच मयताचा मोबाईल फेकून अथवा लपवून ठेवला असावा, अशा आशयाची फिर्याद मयताची आई शिवगंगाबाई गोपीनाथ वस्तूर (रा. चिडेवाडी) यांनी दिल्याने वाढवणा पोलिस ठाण्यात गुरुवारी पहाटे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नौशाद पठाण है। करीत असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींना गुरुवारी चाकूरच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती सपोनि. पठाण यांनी दिली.

Web Title: Murder youth was strangled to death for witnessing an immoral relationship

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here