Home नागपूर ट्रीपल सीट जाताना ट्रकने उडवले, तरुणीसह तिघे ठार

ट्रीपल सीट जाताना ट्रकने उडवले, तरुणीसह तिघे ठार

Nagpur Accident: एका खासगी कंपनीत मुलाखतीसाठी दुचाकीवर ट्रीपल सीट जात असलेल्या तरुणासह महिला आणि तरुणीचा भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना.

Accident triple seater was blown up by a truck, killing three including a young woman

नागपूर | कोंढाळी: एका खासगी कंपनीत मुलाखतीसाठी दुचाकीवर ट्रीपल सीट जात असलेल्या तरुणासह महिला आणि तरुणीचा भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे मृत्यू झाला. ही घटना कोंढाळी- नागपूर मार्गावर झाले. चाकडोह फाट्याजवळ बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली.

सुषमा उमेश वाघाडे (३२), प्रतीक्षा राजेंद्र वाघाडे (२२) तर रोशन नीळकंठ सहारे (२८) तिघेही रा. चमेली, ता. काटोल अशी मृतांची नावे आहेत. बुधवारी सकाळी सुषमा आणि प्रतीक्षा या रोशनच्या दुचाकीने ट्रीपल सीट शिवा सावंगा येथील इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह कंपनीत मुलाखत देण्यासाठी जात होत्या. चाकडोह फाट्याजवळ शिवा रोडकडे दचाकी

वळविताच मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकी रस्ता दुभाजकावर आदळली. यात रोशन, सुषमा आणि प्रतीक्षा हे तिघे रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाजारगाव येथील रुग्णवाहिकेने जखमींना मेडिकलमध्ये पोहोचविले; परंतु तेथे उपचारादरम्यान सुषमा आणि प्रतीक्षाचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या रोशनवर मेडिकलमध्ये उपचार सुरू होते. रात्री ८:३० वाजताच्या सुमारास त्याचाही मृत्यू झाला. पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Accident triple seater was blown up by a truck, killing three including a young woman

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here