Home अहमदनगर चल मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, नर्सचा विनयभंग

चल मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, नर्सचा विनयभंग

Ahmednagar News: ओळखीचा फायदा घेत एका खासगी रुग्णालयातील नर्स सोबत गैरवर्तन करणार्‍या तरुणाविरूध्द येथील कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा (Molested) गुन्हा.

Come on, I want to marry you, nurse molested

अहमदनगर: ओळखीचा फायदा घेत एका खासगी रुग्णालयातील नर्स सोबत गैरवर्तन करणार्‍या तरुणाविरूध्द येथील कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय पंडीत पाखरे (वय 30 रा. चिपाडे मळा, सारसनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

नगर तालुक्यातील एका गावामध्ये राहणार्‍या पीडितेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार बुधवारी सकाळी नगर-पुणे रोडवरील ओम गार्ड येथे झाला. फिर्यादीची अजय पाखरे याच्यासोबत ओळख होती. त्या बुधवारी सकाळी घरून निघून येथील एका खासगी रुग्णालयात ड्युटीसाठी येत असताना रस्त्यामध्ये अजय त्यांना भेटला व त्यांचा हात ओढून, चल मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, असे म्हणून अंगाशी झटू लागला. फिर्यादीने त्याला विरोध केला असता त्याने त्यांना मारहाण केली. तुझ्या आई-वडिलांना जीवे मारून टाकीन, अशी धमकीही दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी तरुणाविरूध्द येथील कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Come on, I want to marry you, nurse molested

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here