Mumbai Crime News : लोकलच्या लगेज डब्यात मृतदेह (Dead Body) आढळल्याने एकाच खळबळ उडाली.
मुंबई: लोकल ट्रेन म्हणजे मुंबईकरांची लाईफलाईनसमजली जाते. दररोज लाखो प्रवासी लोकल ट्रेनने प्रवास करत असतात. मुंबईत धावत्या लोकलमध्ये एक भयानक घटना समोर आली आहे. लोकलच्या लगेज डब्यात मृतदेह आढळल्याने एकाच खळबळ उडाली आहे. रेल्वेच्या मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये हा प्रकार घडला आहे. रेल्वे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.
धावत्या लोकलच्या लगेज डब्यात एका 65 वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळला आहे. या वृद्धाची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. लोकलमध्ये प्रवाशांच्या वादाच्या आणि हाणामारीच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र, आता लोकलच्या डब्यात हत्या झाल्याने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते टिटवाळा स्थानकादरम्यान धावत्या लोकलमध्ये या वृद्धाची हत्या झाल्याची माहिती रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे. हत्या झालेल्या वृद्धाचे नाव बबन देशमुख असे आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात देखील घेतल आहे.
बबन देशमुख हे आंबिवली येथे राहणारे आहेत. आंबिवली येथून लोकल पकडून ते काही कामानिमित्त कल्याणला आले होते. काम आटपून ते पुन्हा आंबिवलीला घरी जाण्यासाठी निघाले. घरी जाण्यासाठी त्यांनी कल्याण रेल्वे स्थाकनातून टिटवाळाकडे जाणारी लोकल पकडली.
देशमुख लोकलच्या लगेज डब्यातून प्रवास करत होते. मात्र, लोकलमध्ये चढतांना किंवा बसण्याच्या कारणावरून इथे वाद होऊन त्यांना मारहाण झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला असावा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेची माहिती कल्याण रेल्वे पोलिसांना मिळताच त्यांनी देशमुख यांचा मृतदेह ताब्यात घेतला. देशमुख यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी महापालिका रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आता ही हत्या नेमकी कोणत्या कारणावरून झालीय हे पोलीस तपासात समोर येईल.
Web Title: Incidents in Running Local; Excitement due to the discovery of a Dead body
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App